गटविकास अधिकारी यांना निवेदन
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी :- उमेद अभियाना अंतर्गत विविध कामे करण्यासाठी गावागावात ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे. एका गटात किमान 10 सदस्य असून एका गावात 10 पेक्षा जास्त बचत गट आहे. म्हणजे जवळ जवळ 100 पेक्षा जास्त महिला असून बैठक घेण्यासाठी हक्काची जागा नाही.त्यामुळ या ग्रामसंघांना ग्रामपंचायतींनी कार्यालय उपलब्ध करून द्यावे, याकरिता तालुक्यातील तब्बल 19 गावांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
या सर्व गावांनी उमेद प्रकल्पांतर्गत ग्रामसंघांची स्थापना केली आहे. त्यात गावातील सर्वसमूह या ग्रामसंघाशी जोडण्यात आले. त्यामुळे ग्रामसंघाची व समूहांची बैठक व्यवस्था करण्यासाठी गावस्तरीय ग्रामसंघकार्यालय असणे गरजेचे झाले आहे.
याकरिता जागेची आवश्यकता आहे. पंचायत समितीकडून या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली त्यामुळे तालुक्यातील मांडवा, मांगुर्ला, बैलंपूर, चिचघाट, पिंप्रडवाडी, राजूर (गो), येडशी, आडेगाव, निंबी, उमरी, मार्की (बु.), धानोरा, वठोली, जुनोनी, लिंगटी, पांढरकवडा (ल), जामणी, पिवरडोल, मांडवी या गावातील ग्रामसंघांनी पंचायत समितीकडे धाव घेतली. मंगळवारी येथील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्यालयासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे .


