म्हैसदोडका येथील घटणा.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज दुपारी 1:30वाजताच्या सुमारास म्हैसदोडका येथील शुभम उत्तम देवतळे वय सुमारे 25 वर्ष विवाहीत युवकाने स्वतःचा घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आज दिनांक 28 मे रोज शनिवारला दुपारी 1:30वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली.
शुभम उत्तम देवतळे वय वय सुमारे 25 वर्ष, रा.म्हैसदोडकाअसे मृताचे नाव असून तो म्हैसदोडका येथे राहायचा आणि रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आज बायको माहेरी निघून गेल्यामुळे निराश झालेल्या विवाहिताने घरामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व त्या नंतर त्याला उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
शुभम यांच्या मागे वडील,पत्नी असा आप्त परिवार आहे. बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे..