बोअरवेलचे पाईप वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन मजुर ठार.

0
57

मेंढोली गावजवळील घटणा..

वणी:- प्रतिनीधी..

वणी :- तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेंढोली गावाजवळ बोअरवेलचे पाईप वाहून नेणारा भरधाव ट्रक पलटी झाला त्यात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार दिनांक 29 मे 2022 ला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली आहे .

रामेन अमृतला पुसाम वय सुमारे 20 वर्ष रा. सोनपरी जि.बालाघाट मध्यप्रदेश असे मृतकाचे नाव असुन भरधाव वेगाने जात असलेल्या बोअरवेलच्या ट्रक या वाहनाचे समोरील चाक फुटले व वाहन पलटी झाल्या मुळे हा अपघात घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्राप्त माहितनुसार MH-29-T 0579 क्रमांकाचा ट्रक पाईप घेवुन शिरपूर मार्गे मेंढोलीकडे जात होता मेंढोली गावापासुन जवळच भरधाव ट्रकचे समोरील टायर फुटला त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ट्रक अनियंत्रित झाला व रोडच्या बाजुला खाईमध्ये पलटी झाला. त्या मध्ये मशीनवर काम करणारा मजुर रामेन अमृतला पुसाम वय सुमारे 20 वर्ष या मजुराचा ट्रकच्या खाली दबून मृत्यु झाला या घटनेची माहिती शिरपुर पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आणि ट्रक खाली दबून असलेल्या मजुराचा मृत्यूदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घडलेला अपघात हा बेजबाबदारपणे व भरधाव वाहन चालविल्याने घडला आहे. याप्रकरणी वाहन चालका विरुद्ध भादवि कलम 304 (अ),337, 338 मोवाका 184 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here