मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथे काल दिनांक 30मे2022रोज भारतीय जनता पार्टी तालुका महिला आघाडीच्या वतीने अर्जुनी येथील सार्वजनिक प्रार्थना मंदिरा मध्ये महिला संवाद मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मायाताई शेरे ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या व महिला आघाडीच्या प्रदेश उपअध्यक्ष रेखाताई कोंडेकर होत्या व जिल्हा महामंत्री संध्याताई अवताळे, शोभाताई नक्षने तालुका अध्यक्ष ज्ञानेश्र्वर चिकटे, शंकर लालसरे पंचायत समिती सदस्या सुनिताताई लालसरे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक मध्ये बोलतांना प्रत्येक महिलांच्या घराघरांमध्ये शासनाच्या योजना गेल्या पाहिजे जर कोणतिही महिला योजणे पासून वंचीत राहत असेल तर त्या महिलांना भा. ज. पा. महीला आघाडी न्याय मिळवु देईल अशी ग्वाही मायाताई शेरे यांनी दिली. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी सहभाग घेतला पाहिजे त्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास साधता येतो अशी माहिती रेखाताई कोठेकर यांनी उपदेशवर भाषणामध्ये दिली.

तर संध्याताई अवताळे यांनी कडक उन्हामध्ये सुध्दा बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला व उपस्थिती दाखवल्या बद्दल प्रशंसा केली. सुत्र संचालन शालिनीताई दारुंडे व आभार प्रदर्शन नंदाताई थेरे यांनी केले ह्या कार्यक्रमाचे आयोजन भा.ज.पा. महिला आघाडीच्या तालुका महामंत्री शालिनीताई दारुंडे,नंदाताई थेरे यांनी केले या कार्यक्रमासाठी सहकार्य सुरेखा आत्राम, ईश्वर टेकाम,प्रमोद आत्राम, मंगला देठे, ज्योती टेकाम, वर्षा पोहनकर व इतरांनी परिश्रम घेतले..