नक्षने, आस्वले गटाचे वर्चस्व
काँग्रेस समर्थित गटाचा झेंडा
अध्यक्ष संदीप सिताराम आस्वले तर उपाध्यक्षपदी विजय वि. बोबडे.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील :- नवरगाव वि.वि.ध.कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये आज दिनांक 31 मे 2022 रोजी मंगळवारला अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून संदीप आस्वले तर उपाध्यक्षपदासाठी विजय बोबडे यांची एक मताने निवड सर्वानुमते मते करण्यात आली.
या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून शासकीय अधिक्षक गवई साहेब व सचिव सुशील जंगेवार निदर्शनात निवडणूक पार पडली या निवडणुकीला प्रमुख उपस्थित रमेशजी सोनुले विलासराव नक्षणें,युवराजजी घोसले,जगदीश रामटेके,संतोष आस्वले, अफजलखा पठाण, रामाजी डवरे व अनेक सहकारी मित्र निवडणूक प्रक्रियाला उपस्थित होते.
या वेळी नवनिर्माण सदस्य अरुणजी नक्षणें,ज्ञानेश्वर वरारकर, पांडुरंग आवारी,विनोद घोसले,सौ. वनमाला फुलझले, बदृद्दीन विराणी,प्रशांत काकडे,महादेव खंडरे,मारोती सोमलकर,योगेश गौरकर,सौ.संगीता डवरे,सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.विशेष सहकार्य अरुण नक्षने यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांकडून अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.