चोपण येथील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात :- मागील काही दिवसांपासून वीज पाडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.काल दिनांक 23 जून 2022 रोज गुरूवारला दुपारी 4 वाजता सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने चोपण परीसरात हजेरी लावली. यात एका सुमारे 44 वर्षीय विवाहीत इसमाचा मृत्यू झाला.
Suresh Pachbhai
संतोष महादेव बावणे वय सुमारे (44 )वर्ष असे मृतक शेतमजूराचे नाव आहे.तो काल दुपारी 4 वाजता सुमारास कुटुंबीया सोबत घरी होता, तो लघुशंकेसाठी (बाथरूम) साठी घराच्या बाजुला असलेल्या बाथरूम मध्ये जात असताना अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला व त्यांचे अंगावर विज पडली.
यात त्यांनी जोरात आवाज दिल्याने कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच घरात असलेल्या मुलगा व त्यांचे वृद्ध वडील धावत जाऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वडिलांना उचलून तात्काळ वणी येथील ग्रामीण रूग्णालयत दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी संतोष याला मृत घोषित केले, मृतक संतोष याचे मागे पत्नी, दोन मुले, व वृद्ध आई, वडील असा आप्त परिवार आहे.