निमणी येथे तिव्र पाणी टंचाई

0
42

प्रशासक आणि सचिव समस्या सोडवण्यास असमर्थ

ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी व तहशीलदार यांना निवेदन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

गावात कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नसल्याने गावात तात्काळ पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी  निमणी च्या महिला व पुरुषांनी  प्रशासनाकडे केली आहे निमनी गावात जुनी पाणी पुरवठा योजना सुरू होती.पाईप लाईन व्दारे  गावाला   सुरळीत पाणी पुरवठा केला जात होता.परंतु ती योजना कालबाह्य ठरवून नविन नविन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले.

सुमारे तीन वर्षांपासून टाकीचे काम सुरु आहे.जुनी पाईप लाईन तोडफोड करून नविन पाईप लाईन चे काम करण्यात आले .जुनी योजना बंद करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले परंतु पाणी पुरवठा सुरु नकेल्याने कृत्रीम पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

उन्हाळ्यात गावालगतच्या शेतातून पाणी आणून गावकरी तहान भागवत  होते .परंतु आता शेतात पेरणी केल्यामुळे जाण्याची रस्ता बंद करण्यात आल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांचे हाल सुरू असल्याची तक्रार गट विकास अधिकारी  आर. व्ही .सांगळे व तहसीलदार गिशिष जोशी यांच्या कडे करण्यात आली आहे .

निवेदन देतेवेळी विमल पुसाम,माधव आत्राम,सरिता किनाके ,तानेबाई कुडमते,कौसल्या झाडे, गंगुबाई किनाके,विजय गेडाम, हिरामण गेडाम,मनोहर कनाके  पोलिस पाटील,बालाजी  गिरसावडे,नरेंद्र वैद्य,राजू पडवेळेकर   अभिचंद्र शेडमाके इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here