बोर्डा शेतशिवारात वाघाने पाडला गाईचा फडशा.

0
41

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार.

वणी :- तालुका प्रतिनीधी.

वणी तालुक्यातील बोर्डा येथील ही घटना गुरुवार दिनांक 23 जून 2022 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे शेतकऱ्यांची शेतकामाची जोमाने लगबग सुरू होताच पुन्हा परिसरात वाघाने एंट्री केल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या बोर्डा व परिसरातील शेतशिवारात कपाशी टोबणी व सोयाबीन पेरणी कामे जोमाने सुरू आहे अनेकाने आपापले पशुधन गुराख्यांच्या राखणीत चराईसाठी घातले आहे त्यातच बोर्डा येथील शेतकरी पंडित गणपत ढेंगळे यांच्या मालकीहक्काची सुमारे 10 वर्षाची दुधाळ गाय ही नेमकी एकच दिवस बोर्डा येथील शेतशिवारात चराईसाठी गेली होती.

अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना 23 जून 2022 रोज गुरुवारला दुपारी 12 वाजताच्या सुमारास गुराख्याच्या निदर्शनास येताच घटना उघडकीस आली. गुराख्याने या घटनेची माहिती पशुधन मालकास दिली पशुधन मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा केला. शेतकरी पशुधन मालक पंडित ढेंगळे यांच्या मालकीची दुधाळ गायीला 3 महिन्यांचे वासरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

  दुधाळ गाईचा वाघाने फडशा पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात दुधाळ गाय ठार झाल्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे वन परिक्षेत्र अधिकारी वणी यांना शेतकरी व पशुपालक पंडित गणपत ढेंगळे यांनी केली आहे. परिसरात शेतीचे काम जोमाने सुरू आहे त्या मुळे वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here