कारवाईचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश.
माहीती अधिकार कार्यकर्ते बंडू देवाळकर यांच्या प्रयत्नाला यश.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी :- जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधी दुर्भा येथिल रास्त भाव दुकान पाटण ला अतिरिक्त दुकान जोडल्या गेले .रास्त भाव दुकानदार सौ.वा.रा.आईटवार यांनी बोगस लाभार्थी दाखवून नियमित शासणा कडून लाभाची उचल करून अपहार केला .यामध्ये गहू १८६.८९ क्विंटल रु .२३५९.७३ प्रमाणे ४४१००९/ व तांदूळ १२७ .६६ क्विटल रुपये ३४४४.१० प्रमाणे ४३९६७३/ असे एकूण ८ लाख ८० हजार ६८२ रुपये वसुली करण्यात यावे.
ही रक्कम शासनाच्या खजिन्यात आदेशाच्या दिनांक दिनांक पासून 30 दिवसाच्या आत वसूल करून रक्कम न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा .पाटण येथील रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करावा व जोडले दुकान काढून घेण्यात यावे. लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने संबंधित रास्त भाव दुकान लगतच्या गावास जोडण्यास यावे अशा प्रकारचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांचे कडून तहसीलदार झरी जामणी यांना पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा माहिती अधिकार कार्यकर्ते बंडू देवाळकर यांनी अनेक दिवसा पासून पाठपुरावा केला होता असून शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. तसेच या प्रकरणाकडे राजकीय नेत्यांचे व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते .