रानडूकराचा हल्यात दोन युवती सह एका महिला जखमी.

0
31

एक युवती गंभीर जखमी.

घोडदरा येथील शेतशिवारातील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे काल दिनांक 3 जुलै 2022 रोज रविवारला शेतातून फुली बाद टोबनीचे काम आटपून घराकडे परत येत असताना गावाजवळील दुमोरे यांच्या शेताजवळ दोन युवतीवर व एका महिलेवर रानटी डूकराने अचानक मागुन हमला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की..
लक्ष्मी/दुर्गा विठ्ठल नेहारे वय सुमारे 18 वर्ष रा.घोडदरा ईला गंभीर जखमी केले तर कोमल गणेश जीवतोडे वय सुमारे16 वर्ष आशाताई गणेश जीवतोडे वय सुमारे 38 वर्ष यांना जबर गुप्ती मार लागला आहे.गावांतील शेतकरी गणेश जीवतोडे यांचे शेतात पराटी फुली बाद टोबणीचे काम आटपून घराकडे परत येत असताना गावाजवळील दुमोरे यांच्या शेताजवळ रानटी डुकराणी मागुन हल्ला करून दोन युवती सह एका महिलेला गंभीर जखमी केले आहे.

जखमीना वडील व गावांतील काही लोकांच्या मदतीने तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वणी येथे पाठविण्यात आले आहे. दिवसे दीवस रानटी जनावारांची संख्या वाढत चालली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केली जात आहे.

आता हे रानटी प्राणी लोकांच्या जिवावर उठले आहे.तालुक्यात आजवर वन्य प्राण्यांच्या हल्यात जिव गमवावा लागला आहे. आहे.वनविभाकडून रानटी प्राणाचा बंदोबस्त करावा व जखमीना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मुलींच्या वडीला सह गावकरी व परिसरातून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here