तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामनी राज्यासह जिल्यात तालुक्यात गावागावात दरवर्षी 1 जुलै ‘ला कृषी दिन साजरा करण्यात येत असतो.25 जून 1 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ कृषी दिन साजरा केला जातो.
देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचं मोठं योगदान आहे. त्यांना राज्याच्या हरित क्रांतीचे जनक म्हटलं जात.राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसं स्वयंपूर्ण होईल यावर वसंतराव नाईकांनी विशेष लक्ष दिल.
स्व वसंतराव नाईक व कृषिदिनाचे औचित्य साधून झरी तालुका कृषी विभागामार्फत जयंती, कृषिदिन साजरा करण्यात आला व कृषी संजीवनी साप्ताहची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम झरी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आला.कृषी विभागाच्या वतीने कृषिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप,पीक स्पर्धा विजेते, उत्कृष्ट व प्रगतशील शेतकरी यांना प्रशास्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित शेतकऱ्यांना सेफ्टी किट चे वाटप करण्यात आलेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी गट विकास अधिकारी जाधव साहेब, प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी अमोल आमले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मनोज जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी गिरी साहेब उपस्थित होते.
कृषी अधिकारी यांनी कृषी दिनाच्या निमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मनोज जाधव यांनी कृषी विभागाच्या सम्पूर्ण योजनेबद्दल माहिती दिली.
प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कमेटी तयार करण्यात येईल, प्रत्येक गावात कृषिमित्र, कृषिताई यांची नियुक्ती करण्यात येईल, शेतकरी बांधवाना शेती व्यवसायायत तांत्रिक अडचणी आल्यास या कमेटी द्वारे मदत होणार व वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार अशी ग्वाही कृषी अधिकारी आमले यांनी दिली.यावेळी कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषिमित्र उपस्थित होते.