पेरले पण उगलेच नाही.
हवादिल शेतकऱ्यांचे कृषी अधिकारी यांना निवेदन
मदतीची केली मागणी.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी :- तालुक्यातील सुर्दापूर येथील ब-याच शेतक यांनी आपल्या शेतात एका नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाणाची पेरणी केली होती.ते बियाणे एका अधिकृत विक्रेत्या कडून खरेदी केले होते.पण पाणी पाऊस व्यवस्थित असातानाही पेरणीनंतर या बियाणाची उगवणक्षमता खूपच कमी असल्याचे दिसून आले. हे बियाणे फार कमी प्रमाणात उगवले .त्यामुळे या शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. साहजिकच यामुळे या शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
तसेच इतर कंपनीचे बियाणाची पेरणी केली असता त्याची उगवणक्षमता चांगली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शेतक-यांची खात्री झाली की, सदर बियाणे बोगस आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून आम्हाला मदत द्यावी अशी समस्त शेतक-यांची मागणी आहे. या तक्रारकर्त्या शेतक-यांमध्ये नरेंद्र मल्लारेड्डी गुलावार, संजय विठ्ठल मोठ्यमवार, मुर्लीधर विनायक वैद्य, दत्तात्रय विठ्ठल मोठ्यमवार, नागेश्वर बापुराव गुलवार,
केशव लसमन्ना गुंडावार, आकाश लिंगारेड्डी गड्डमवार, कृष्णराव शिवराम वैद्य, रविंद्र प्रभाकर बद्दमवार, रविंद्र आशना संकसनवार, राजु भुमारेही निम्मलवार, अशोक आशन्ना बद्दमवार, शेख राजमियाँ शेख मेहबुब शेख मुन्ना, शेख महमद शेख मेहबुब शेख इस्माईल शेख मेहबुब, अविनाश भुमारेड्डी बोदकुरवार, संजय भुमारेड्डी संकसनवार, गजानन

सुदर्शनसंकसनवार व्यकन्ना सुदर्शन संकसनवार, रामरेड्डी ईस्तारी कामनवार, लिंगारेड्डी किष्टारेड्डी गुम्मडवार, विठ्ठलरेड्डी हनमंतु बेल्टीवार, शेख गफूर शेख फरिदसाहब, शंकर काशिनाथ काळे, गंगाधर मादस्तवार आणि सुरेखा अन्नसतीवार इत्यादी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहे .


