दांडगाव येथील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील :- वर्धा नदीला जोळणाऱ्या दांडगाव ते मार्डी या नाल्यात एका सुमारे 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मारेगाव तालुक्यातून दांडगाव ते मार्डी वाहणाऱ्या वर्धा नदीला मिळणाऱ्या नाल्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह 17 जुलै 2022 रोज रविवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास आढळून आला आहे.
या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना येथील पोलिस पाटलांनी दिली आहे. सदर महिलेची ओळख अजून पर्यंत तरी पटली नाही. महिला बेपत्ता असल्या बाबत मारेगाव पोलिसात तक्रार नाही.त्यामुळे ओळख पटविण्यात पोलीसांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मार्डी ते दांडगाव सुमारासच्या डॅम जवळ झाडाच्या फांदीला मृतदेह अडकून असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले.
महिलेच्या अंगावर निळ्या रंगाची साडी असून एकाच पायात चप्पल होती साडी सुद्धा अस्तव्यस्त असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनाची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनस्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.


