आदिवासी विकास परिषदेचे तहसीलदारयांना निवेदन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यामध्ये सतत सुरु असलेल्या पावसामुळे तालुका जलमय झालेला आहे. शेतकऱ्याची शेतीच या पावसाने खरडून नेली. पिके पिवळी पडत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे करण्यात आली.
मारेगाव तालुक्यात मागील 16 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहेत.
अशातच सुरुवातीला बेंबळा प्रकल्पाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. आता सततच्या पावसाने उर्वरित पिकेही नष्ट होण्याच्या मार्गांवर आहेत. सुरुवातीला दुबार पेरणी, आता अतिवृष्टी या भयंकर परिस्थितीमध्ये शेतकरी पिचला जात आहे. शेतकऱ्यांच्या हातचे पीक जाण्याच्या मार्गांवर आहे. शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेला आहे.
या परिस्थितीतून सावरण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या मारेगाव तालुका शाखेने तहसीलदार मारेगाव यांना दिले. यावेळी तालुका अध्यक्ष सुमित गेडाम, कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके, उपाध्यक्ष राजू सिडाम, गंगाधर लोणसावळे महाराज यांच्यासहित अनेक जण उपस्थित होते.


