नाताने माझी आजी असल्याची माहिती पोलिसांना दिली.
दांडगाव येथील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील :- वर्धा नदीला जोळणाऱ्या दांडगाव ते मार्डी या नाल्यात एका 74 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मारेगाव तालुक्यातून दांडगाव ते मार्डी वाहणाऱ्या वर्धा नदीला मिळणाऱ्या नाल्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह 17 जुलै 2022 रोज रविवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास आढळून आला होता. या घटनेची माहिती मारेगाव पोलिसाना येथील पोलिस पाटलांनी दिली होती.
पण सदर महिलेची ओळख पटली नव्हती. आणि महिला बेपत्ता असल्या बाबत मारेगाव व जवळील कुटल्याच पोलिस ठाण्यात तक्रार नसल्याने.मुळे ओळख पटविण्यात पोलीसांना अडचणीचा सामना करावा लागला होता.पण आज दिनांक 19 जुलै 2022 रोज सकाळी 11वाजताच्या सुमारास नातेवाईका कडून कॉल वर मिळालेला माहिती वरुण सदर मृतदेह श्रीमती. मीराबाई वासुदेव पिंपळकर वय सुमारे 76 वर्ष रा. पांजुर्णी ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील असल्या बाबतची माहिती मृत मीराबाई यांच्या नातु निखील कडून प्राप्त झाली आहे.
मार्डी ते दांडगाव सुमारासच्या डॅम जवळ झाडाच्या फांदीला मृतदेह अडकून असलेल्या महिलेच्या अंगावर निळ्या रंगाची साडी होती.ती साडी माझ्या आजीची असल्याची माहिती त्यांनी दिली व पायात चप्पल होती ती पण माझ्या आजीचीच आहे.अशी माहिती मारेगाव पोलिसांनी संपर्क साधला असता त्यांनी दिली. व पांजुर्णी गावासभोवती पाणी असल्यामुळे ते गावाच्या बाहेर निघून शकत नाहीत असे मृतक यांच्या नातू निखिल यांनी सांगीतले व सदर मृतदेह हा माझ्या आजीचा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मृतक महिलेची ओडख पटविण्यासाठी मारेगांव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात रजनीकांत पाटील, विणेश राठोड,अजय वाबिटकर, यांचे मोलाचे योगदान आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.