बोरच्या पाण्यामुळे नुकसानीत भर,
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेतकरी नंदकिशोर वामन कळसकर यांचे कडे 12 एकर शेती आहे.त्यांचे शेत गावापासून सुमारे 1 कि.मी अंतरावर आहे.शेतातली बोअर वेल ला गेल्या 10 दिवसा पासून मोटर पंप बंद असताना सुध्दा मोठया प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. अतीवृष्टी मुळे शेतात पाणीच पाणी साचले असताना काल पासून शेतात असलेला बोर फुल्ल भरला असुन बोर मधून पाणी यायला सुरूवात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अतिवष्टीचे पाणी आणि बोर मधून ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यामूळे शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी साचले असुन शेती पिकांचे नुकसान होत आहे. पहिल्यादाच बोर मधुन आपोआप पाणी वाहत असल्याने बोअर मधून वाहणाऱ्या पाण्याला पाहण्यासाठी गावकरी मोठी गर्दी करताना दिसत आहे. शेतकऱ्याला अतिृष्टीमुळे दुबार तीबर पेरणीचे संकट आले असताना या पाण्यामुळे आणखीच भर पडली आहे.त्या मुळे शेतकरी हतबल झाले आहे.त्यात हि जर नैसर्गिक आपत्तीत शेतकरी सापडले आहे.