पावसाचा कहर शेतकरी चिंतेत.

0
62

कापुस,सोयाबीन,तुर यासह इतर पिक धोक्यात.

आजपर्यंत एकूण ६४४ मी मी पाऊस अंदाजे ८०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसानीची प्रशासनाकडून माहीती.

ओला दुष्काळ जाहीर करावा – शेतकऱ्यांची मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील जुन महिन्यात तुरळक व अनिमित पावसाने दुबार तीबार पेरणी करावी लागली परंतु जूलै महिन्या पावसाची जोरदार सुरुवात झाली.अनेक ठिकाणी ढग फुटी सदृश्य पाऊस झाला.आजपर्यंत तालुक्यात एकूण ६४४ मीमी पाऊस पडला.यावर्षी.लवकरच भुजल पातळी वाढली असुन लहान मोठे नदी नाले ओसंडून वाहत आहेत.विहीरी तुडूंब भरलेल्या असून बोरवेल ची पातळी वाढली आहे.पवनार , खडकडोह.पाचपोहर,भिमनाळा इ . सिंचन लघू प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो झाले आहे .

जुन महिन्यात हवा हवासा वाटणारा पाऊस नकोसा झाला आहे.सतत पावासामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे . पैनगंगा व खुनी नदीच्या पुरामुळे बरिच सुपिक जमिन पुराच्या पाण्याखाली गेली त्यामुळे कोवळी पिकं सडून गेली तसेच बरिच सुपिक जमिन खरडून नेली.मागच्या महिन्यात २१ सतत पाऊस पडला २८ जुलै ते ४ आगस्ट पर्यत थोडी विश्रांती घेतली त्यांनर पुन्हा धुवाधार पाऊस पडत आहे.सतत च्या पावसाने जमिन दलल झाली आहे.संपूर्ण पिक पिवळी पडली असून पिकांची वाढ खुटली आहे.

महिना झाला डवरणी,निंदन खुरपण,खत व फवारणी इ. मशागतीची कामे थांबली असून मशागती अभावी पिकांपेक्षा तण मोठे झालेले दिसून येत आहे. तणनाशकांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चिबाड जमिनीवरील पिक कायमचे नष्ट झाले असून वाराणसार जमी वरिल पिकं धोक्यात आली आहे.बोंड आळी मुळे व इतर कारणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशी व सोयाबीन वाणाची लागवड करतात.परंतु सततच्या पावसाने पिकाची वाढ खुंटली आहे अजून पाऊस सुरुच आहे.

गेल्या वर्षी प्रमाणे पुढे लांबला तर चांगल्या सुपीक जमिनीत सुद्धा एकरी एक क्विंटल सोयाबीन आणि कापूस होण्याची शाश्वती दिसत नाही. महसूल विभागाने आणखी प्रत्यक्ष पाहणी केल्यास नुकसानीची आकडेवारी आणखी वाढणार आहे . पावसाने शेतातून झरे वाहताना पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या आहे.पदरी काही पडण्याची नसून नैसर्गिक आपत्तीने बळीराजा हवालदिल झाला दिसत आहे.शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.मात्र शासनाने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

तरी नक्की मदत किती मिळणार काय मिळणार याचा पता नाही.चालू पिककर्जदार शेतकरी ५० हजार रुपये अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या अडीचवर्षापासून तो पोकळ घोषणा ऐकत आहे.एकीकडे शेतकरी आर्थिक संकट संकटात सापडला असताना सरकारकडून फक्त घोषणाचा पाऊस होतांना दिसत आहे.मदत मात्र कवडीची नाही.जनतेचा सरकार वरून विश्वास ढळत चालला आहे.यावर्षी शेतकऱ्याची परिस्थिती गंभीर आहे .नवीन भाजप सेना युती सरकारकडे शेतकरी मोठ्या आशेने पाहत असून पिक कर्ज माफ करावे,सरसकट पिक विमा लागू करून ओलादुष्काळ जाहीर करावा व तात्काळ आर्थिक मदत मिळावी मागणी होताना दिसत आहे .

प्रतिक्रिया ” शेतकऱ्याचा संपूर्ण खरिपाचा हंगाम हातून गेला आहे त्यामुळे सरकारने तात्काळ ओलादुष्काळ जाहीर करावा व मदतीची व्यवस्था करावी.तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढले आहे त्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे.नियमानुसार जोखीम रकमेच्या ५०% रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी “

श्री . वासुदेव उर्फ राजूभाऊ विधाते
प्रगतशील शेतकरी / सामजिक कायकर्ते
मार्की बु.

” सुरुवातीला पावसाअभावी उशिरा पेरणी आणि त्यानंतर महिनाभर सतत पाऊस पडतो आहे . तूर पिक अधिच गायब झाले ,सोयाबीन व कापूस एकरी एक क्विंटल पिकण्याची आशा दिसत नाही . सर्वच शेतकऱ्यांची असून सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी . “
चंद्रकांत मिलमिले ,
तरुण शेतकरी , पवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here