▪️आझादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रव्यापी मोहिमे अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी: तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी गृहलक्ष्मी बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत सुरू असणाऱ्या गुरुकुल कॉन्व्हेंट, मुकुटबन येथे आज रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव मोठ्या उत्साहात चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला.’आझादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रव्यापी मोहिमे अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन शासनाने दिलेल्या कार्यसुची नुसार आज गुरुवार दि.११/०८/२०२२ ला गुरुकुल कॉन्व्हेन्ट मुकुटबन येते प्री प्रायमरी ( नर्सरी, केजी-१, केजी-२ ) विभागातर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन अजित जाधव पोलीस निरीक्षक पो. स्टेशन मुकूटबन तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष सचिव तसेच संचालक उपस्थित होते.
याप्रसंगी प्री प्रायमरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना राखी बांधून सामाजिक सलोख्याचे उदाहरण समाजासमोर प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष रा.गजभिये यांनी केले.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी आपण असे कार्यक्रम आयोजित करून आपल्या संस्कृती चा वारसा जपण्याचे स्तुत्य उपक्रम राबवित आहेत त्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले. याप्रसंगी मुलींनी सर्व पाहुण्यांना राखी बांधली. कार्यक्रमाचे संचालन इंग्रजीचे शिक्षक आशिष साबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका माधुरी कोकमवार यांनी केले.


