ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

सत्कार झाला, पण चर्चा “त्यागा’च्या मिश्किल कोपरखळीची:4 आमदारांच्या सत्कार सोहळ्यात आ. कोल्हे म्हणाले, सुजयदादांच्या त्यागामुळे माझा नंबर लागला‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषदेवर गेलेल्या जिल्ह्यातील ४ नवनिर्वाचित आमदारांचा शुक्रवारी झालेला सत्कार सोहळा चांगलाच रंगला. काहीसे शिस्त व गंभीर वाटणाऱ्या राजकीय मंचावर आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे यांचे आभार मानले. पण ते मानताना त्यांनी “माजी खासदार सुजय विखे यांनी त्याग केला म्हणून आपला नंबर लागला’ हे वक्तव्य उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरले. दरम्यान, सुजय विखे यांनी याआधी एका जाहीर कार्यक्रमात “तुम्हाला मिळालेली पदे ही आम्ही सोडून दिलेली आहेत. सत्कार, स्वार्थासाठी आम्हाला पदाची आम्हाला गरज नाही’, असे विधान केले होते. त्याला ही आ.कोल्हेंची मिश्किल कोपरखळी होती की कायॽ असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आ. विवेक कोल्हे यांचे वक्तव्य वरकरणी आदराचे आणि आभाराचे वाटत असले, तरी त्यामागील उपरोधिक टोला सुज्ञ कार्यकर्त्यांच्या चांगलाच लक्षात आला. विशेष म्हणजे व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे व्यासपीठावर असताना हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. वास्तविक पाहता, कोल्हे आणि विखे यांच्यातील हा कलगीतुरा नवीन नाही. कोल्हे आणि विखे कुटुंबातील राजकीय संघर्ष जिल्ह्यासह राज्याला परिचित आहे. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे यांनी पालकमंत्र्यांच्या तालुक्यात विरोधकांकडून सत्कार स्वीकारला होता. यावेळी त्यांनी “मुख्यमंत्र्यांनी आमदारकीचा बिल्ला माझ्या छातीवर लावला आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. विधान परिषद आमदार झाल्याने आपल कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे, त्यात राहाता आणि लोणीही येते,’ असे म्हणत सूचक विधान केले होते. आमदार सत्कार सोहळ्यातील विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आ. विवेक कोल्हे सुजय विखे जिल्ह्यासाठी ऐतिहासिक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातून एकाच वेळी चार आमदार विधान परिषदेवर जाणे ही मोठी ऐतिहासिक घटना आहे. या नव्या आमदारांच्या माध्यमातून जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळाले आहे. जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत काम करून जिल्हा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. भारतीय जनता पार्टी ही योग्य व्यक्तीला योग्य संधी देणारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भाजपचे विधान परिषदेचे नूतन सदस्य आमदार सुनील कर्जतकर, आमदार विवेक कोल्हे व आमदार प्राजक्त तनपुरे तसेच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार अक्षय कर्डिले यांचा सत्कार सोहळ्यावेळी मंंत्री विखे पाटील बोलत होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर