ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही. एकतर सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा तुकडा पडेल या भूमिकेवर मी आलो आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण सरकारला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. 29 मे रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत. यापेक्षा किती जास्त वेळ सरकारला द्यायचा, गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवर का अन्याय केला जातो? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आपल्या समाजाला काही मिळत नसेल तर कठोर पाऊल उचलावे लागतील. फडणवीसांना मराठ्यांवर अन्याय करायचाय मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला काही प्रसाद लाड यांना दोष द्यायचा नाही.
त्यांनी सांगितले की मी मराठा आहे. पण आता त्यांचे डोळे उघडले असतील की त्यांचे देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहेत आणि म्हणून आपण त्यांना बोलतो. मी उगाच कोणाला बोलत नाही. त्यांनी आमच्या माता-भगिणींना मारले म्हणून आम्ही त्यांना बोलतो. देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी द्वेष भरलेला आहे. त्यांना मराठा समाजावर अन्याय करायचा आहे. जे मंत्री आमच्याकडे येतात त्यांना टार्गेट केले जाते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अनेकांचे फोन आले पण मी फोनवर चर्चा करणार नाही. माझ्या समाजासाठी मी काम करत आहे. इतके क्रुर सरकार कधी आले नसेल. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज सधन आहे म्हणून त्यांना आरक्षण देता येणार नाही, असे सरकार सांगते. मराठवाड्यात पाणी नाही आणि आरक्षण नाही. तुम्हाला जर खेटायचे असेल तर आता आपण खेटूच. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे मंत्री आमच्याकडे येतात म्हणून त्यांना टार्गेट केले जाते. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी मिळत नाही. मराठ्यांकडे कोणता मंत्री जाऊ नये ही त्यांची भूमिका. सरकारची भूमिका दुटप्पी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता जे होईल ते होईल मी माझ्या शरीरांचा विचार करणार नाही. माझ्या समाजासाठी सर्व काही करण्याची माझी तयारी आहे. समाज बांधवांनी आंतरवालीकडे येऊ नये. सरकारला मराठा समाजाबद्दल माया असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. सरकार केवळ बोलते आहे, समाजासाठी काही होणार नाही. मंडप न टाकता आम्ही हे उपोषण करणार आहोत. मला केवळ चर्चा नको आहे. तर माझ्या बांधवांना आरक्षण मिळणार आहे का? सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. पोलिस कट रचून आमच्यावर हल्ले करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही, आणि आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. सरकार काही काम करत नाही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. सरकारकडून साधेसाधे काम केले जात नाही. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? पण ते केले नाही. ओबीसींनी न मागता त्यांच्यासाठी मंत्रालय स्थापन करण्यात आले. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा जीआर काढला नाही. आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या. सरकारने 50 वर्षांमध्ये आमचे वाटोळे का केले. आमच्या 5 पिढ्यांचे नुकसान कोण भरूण काढणार.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर