ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शिवसेनेशी युती होणार हे अंतिम:मुंबईतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला, सध्या उमेदवार फायनल करणे सुरू – बावनकुळे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप-शिवसेना युती होणार हे अंतिम असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून युतीच्या मुद्यावर चर्चा केली आहे. त्यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत. या प्रकरणी फार काही राहिले नाही, युतीचा तिढा जवळपास सुटला आहे, असे ते म्हणालेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. त्यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अद्याप सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला नाही. पत्रकारांनी याविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी हा प्रश्न जवळपास सुटल्याचे स्पष्ट केले. फडणवीस – शिंदेंत युतीवर चर्चा बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून युतीच्या मुद्यावर चर्चा केली आहे. त्यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत. त्यावर कामही सुरू झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी फार काही राहिले आहे असे मला वाटत नाही. तिढा जवळपास सुटला आहे. आमच्या जागांवर आम्ही आमचे उमेदवारही फायनल करत आहोत. ज्या ठिकाणी वाद असतील ते चर्चेने सोडवले जातील. पण 90 ते 95 टक्क्यांवर काहीही प्रॉब्लेम नाही. बावनकुळे यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, त्यांच्या पक्षात कुणाला घ्यायचे, कुणाला सोबत घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यांच्या अंतर्गत बाबींवर मी बोलणे योग्य नाही. त्यांनी निर्णय करायचेत. अजित पवारांचा पक्ष काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे. अकोल्यात असे घडत आहे. आमची चंद्रपूरसाठीही चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. भाजपची मुंबईत 13 मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. आमची रिपाइंशी चर्चा सुरू आहे. आमच्या घटक पक्षांशीही चर्चा सुरू आहे. नागपुरात जोगेंद्र कवाडेंशी चर्चा सुरू आहे. जयदीप कवाडे यांच्याशीही संवाद सुरू आहे. त्यामुळे त्या – त्या पातळीवर, त्या – त्या ठिकाणी, त्या – त्या पक्षाची क्षमता पाहून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. या पक्षांना भाजप किंवा शिंदे गटाच्या कोट्यातून जागा दिली जाईल. शरद पवार एनडीएत येणार का? सध्या शरद पवार एनडीएत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना तसे संकेत दिलेत. पत्रकारांनी याविषयी बावनकुळेंना छेडले असता त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. आज एनडीएचे निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. हा अधिकार केंद्रीय भाजपला आहे. आमचे पंतप्रधान मोदी व अमित शहा व जे पी नड्डा हे याविषयी ठरवतील. पण महाराष्ट्रात आता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही भाजप – सेना महायुती म्हणून लढत आहोत. नगरपालिकेत आम्ही वेगवेगळे लढलो. त्या – त्या स्थानिक राजकारणात काय परिस्थिती निर्माण होईल, स्थानिक पातळीवर कोणत्या युत्या होतील. आम्ही जास्त अधिकार स्थानिक लेव्हलला दिलेत. त्यानुसार त्या – त्या लेव्हलला सर्वकाही ठरत आहेत. त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. राज्याच्या महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. सुधीर मुनगंटीवार नाराज नाहीत बावनकुळे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार पक्षावर नाराज नाहीत. शांत आहेत. आम्ही सर्वजण शांतपणे बसलो आहोत. मुनगंटीवार यांच्याविषयी चुकीचा गैरसमज निर्माण केला जात आहे. कारण नसताना असे केले जात आहे. ना त्यांच्या मनात तसे काही आहे, ना आमच्या मनात तसे काही आहे. मुनगंटीवर आमचे नेते आहेत. राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आम्ही चंद्रपूर व विदर्भातील महापालिका लढवत आहोत. स्थानिक पातळीवर पक्षप्रवेश होताना काही जुने कार्यकर्ते नाराज होतात. पण भाजपचा डीएनए असा आहे की, कुणी भाजपमध्ये नवे आले तर पक्ष त्याला सांभाळून घेतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर