ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 71 लाख महिला अपात्र:ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी! 1 कोटी 75 लाख महिलांना मिळणार लाभ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू असून महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होत आहेत. सुरुवातीला तब्बल 2 कोटी 62 लाख अर्ज दाखल झाले होते. मात्र, छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या. चारचाकी वाहन असणे, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे किंवा तांत्रिक कारणांमुळे जवळपास 10 लाख महिला आधीच अपात्र ठरल्या होत्या. योजनेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांची खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली होती. सरकारचे दरमहा 1065 कोटी वाचणार महिला व बालविकास विभागाने केलेल्या या पडताळणीमुळे आता सरकारचे दरमहा होणारे 1065 कोटी रुपयांचे नुकसान टळणार आहे. एप्रिल 2026 पासून या अपात्र महिलांना मिळणारे 1500 रुपये बंद केले जाणार आहेत. मात्र, गेल्या 20 महिन्यांपासून जे मानधन दिले गेले, त्या अवाढव्य खर्चाची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जाण्याची शक्यता आहे. 30 एप्रिलपर्यंत करा दरम्यान, ई-केवायसी करताना अनेक लाभार्थींना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याने तसेच राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे या योजनेतील अनेक पात्र लाभार्थीना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. विशेषतः कुटुंबातील सरकारी नोकरीबाबत चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अनेक बहिणींचे 1500 रुपये बंद झाले होते. या तक्रारींची आणि ज्या महिलांची ई-केवायसी प्रलंबित राहिली होती, त्याची दखल घेत सरकारने पून्हा 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या महिला आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्या खात्यात मे महिन्यापासूनचे पुढील हप्ते जमा केले जाणार नाहीत. तसेच, त्यांचे नाव तात्पुरते निलंबित होऊ शकते. या योजनेत अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि सरकारी नोकरीत असूनही लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. ‘अर्ज भरा आणि लाभ मिळवा’ या धोरणामुळे लाभार्थ्यांचा आकडा 2 कोटी 47 लाखांवर गेला होता. मात्र, आता ई-केवायसी आणि डेटा शुद्धीकरण मोहिमेत यातील 71 लाख महिला निकषात बसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर