ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

सलग तिसऱ्या वर्षी मोहरम मिरवणूक रेंगाळली:दोन्ही सवाऱ्या रात्री पावणेनऊ वाजता दिल्लीगेटमधून बाहेर,पावसाच्या हजेरीनंतर वाढला वेग‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरम मधील इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवारीची ‘कत्तलची रात्र’ व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र, या दोन्ही मिरवणूका बराचवेळ रेंगाळल्या. कत्तलची रात्र मिरवणूक शनिवारी रात्री बारा वाजता सुरू झाली. रविवारी सकाळी १०.३० वाजता सवारी पुन्हा कोठल्यात पोहचली. त्यानंतर दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली. रात्री पावणेनऊ वाजता सवारी दिल्लीगेट वेशीबाहेर पडली. रात्री उशिरा सावेडी गावात विसर्जन करण्यात आले. दोन्ही मिरवणुका पारंपारिक मार्गाने काढण्यात आल्या. त्यासाठी सुमारे एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरुवारी मध्यरात्री कोठलामधून छोटे इमाम व मंगलगेट हवेली भागातून बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची ‘कत्तलची रात्र’ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पाच टेंभ्यांना परवानगी देण्यात आली होती. मध्यरात्री १२ वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली. मंगलगेट हवेली, दाळ मंडई, तेलीखुंट, शहाजी रोड, मोचीगल्ली, जुना बाजार, अर्बन बँक रोड, आनंदी बाजार, कोर्टगल्ली, सबजेल चौक, जुनी महापालिका, पंचपीर चावडी, धरती चौक, हातमपुरा, रामचंद्र खुंट मार्गाने दोन्ही सवाऱ्या सकाळी पुन्हा आपापल्या जागी नेण्यात आल्या. शुक्रवारी दुपारी १२ वाजता विसर्जन मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही सवाऱ्या खेळवत पारंपारिक मार्गाने नेण्यात आल्या. विविध ठिकाणी भाविक त्यावर फुलांची चादर चढविण्यात आली. सरबताच्या गाड्यांना जुन्या महापालिकेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही मिरवणूक रेंगाळली. आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यानंतर अर्ध्या तासात सवारी दिल्लीगेट वेशीजवळ पोहचली. पावणेनऊच्या सुमारास सवारी वेशीबाहेर पडली. रात्री उशिरा सावेडी गावात सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, दरवर्षी मिरवणूक रेंगळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षीही मिरवणूक रेंगाळली होती. यापूर्वी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सवारी वेशीबाहेर पडत होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर