ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

उद्योगपतींना सरकारची खिरापत:केंद्राची उद्योगांना 16 लाख कोटी, तर शेतकऱ्यांना फक्त 1.88 लाख कोटींची कर्जमाफी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्र सरकारने उद्योगपतींना ११ वर्षांत १६.३५ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या तुलनेत बळीराजाला १,८८,२५४ कोटींचीच कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांच्या तुलनेत उद्योगपतींची कर्जमाफी साडेआठ पट आहे. २०१८-१९ या एकाच वर्षात केंद्राने कंपन्यांचे सर्वाधिक १,२५,३२० कोटींचे ‘लोन राइट ऑफ’ केले. त्याच वर्षी शेतकऱ्यांना १२,७२८ कोटींची कर्जमाफी दिली आहे. उद्योगपतींची वर्ष-२०१८-१९ ची कर्जमाफी दहा पट आहे. महाराष्ट्राच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या (७.८ लाख कोटी) तुलनेत दुपटीपेक्षा अधिक उद्योगपतींची कर्जमाफी आहे. उत्तर प्रदेशच्या (९.१२ लाख कोटी) तुलनेत उद्योगपतींची कर्जमाफी दीडपट आहे. कर सवलतीमुळे ५ वर्षांत ४.५३ लाख कोटींचा महसूलही बुडाला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीच्या रिपोर्टनुसार केवळ कर्जमाफीच नव्हे तर कॉर्पोरेट्सना विविध कायदेशीर तरतुदींनुसार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कर सवलतीही दिलेल्या आहेत. त्यात थेट करमाफीचाही समावेश आहे. यामुळे सरकारी तिजोरीत जमा होणारा महसूलसुद्धा बुडाला आहे. २०१९-२० दरम्यान कॉर्पोरेट करदात्यांना ९४,१०९ कोटींची कर सवलत दिली. २०२१-२२ दरम्यान हा आकडा वाढून ९६,८९२ कोटी झाला. २०२३-२४ मध्ये सर्वाधिक ९८,९९९ कोटींची कर सवलत दिली गेली. मागच्या पाच आर्थिक वर्षांत २०१९-२० ते २०२३-२४ दरम्यान कॉर्पोरेट कंपन्यांना कर सवलतीतून ४,५३,२१९ कोटी रुपयांची सूट दिली आहे. बँकांचा एनपीए कमी दाखवून रिकव्हरी रेट वाढवण्याचा फंडा बँकांचा एनपीए कमी दाखवत रिकव्हरी रेट वाढवण्यासाठी हा फंडा केला. सार्वजनिक बँकांचा ढोबळ एनपीए ३१ मार्च २०२१ रोजी ९.११% होता. तो ३१ मार्च २०२५ रोजी घसरून २.५८% झाला आहे. उद्योगांचे कर्ज निर्लेखन खात्यांमधून होणाऱ्या वसुलीचा दर २०२१ मध्ये १८.५८% होता. हा दर वाढून २०२५ मध्ये ४६.६४% पर्यंत पोहोचला आहे. म्हणूनच अर्थव्यवस्था डबघाईस अर्थव्यवस्था म्हणूनच डबघाईस आलीय. महसूल बुडवून उद्योगपतींवर मेहेरनजर दाखवल्यामुळेच देशातील जनतेला महागाईची झळ सहन करावी लागते आहे. -डॉ. मारुती तेगमपुरे, अर्थतज्ज्ञ एकाच वर्षात ९८,९९९ कोटींची सर्वाधिक कर सवलतही दिली १. २०१९-२० : कंपन्यांना ९४,१०९.८३ कोटींची कर सवलत देण्यात आली आहे. २. २०२०-२१ : ८१,६०८.६४ कोटी करमाफी ३. २०२१-२२ : या वर्षी हा आकडा ९६,८९२.३९ कोटी रुपये इतका होता. ४.२०२२-२३ : या दरम्यान ८१, ६०७.५८ कोटींचे कर माफ केले आहे. ५. २०२३-२४: मध्ये सर्वाधिक ९८,९९९.५७ कोटींची थेट करमाफी दिली आहे.
२०१९-२० ते २०२३-२४ या ५ वर्षांत कंपन्यांना ४ लाख ५३,२१९ कोटींची करातून सूट उद्योगपतींना ५ वर्षांत ४.५३ लाख कोटींची कर सवलतही दिली १. २०१८-१९: बँकांनी ‘लार्ज इंडस्ट्रीज’चे सर्वाधिक १,२५,३२० कोटी रुपये कर्ज माफ केले. याच आर्थिक वर्षात शेती आणि संलग्नित कृषी व्यवसायांचे फक्त १२,७२८ कोटी रुपये माफ केले. २. २०१९-२० : मोठ्या उद्योगांचे १,२२,९४१ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. कृषी क्षेत्राला फक्त १२,९६९ कोटी रुपयांचीच कर्जमाफी दिली आहे. ही तफावत प्रत्येक वर्षी दिसून येते आहे. ३. २०२०-२१ : उद्योग घराण्यांना ९७,३०४ कोटी रुपये व मोठ्या सर्व्हिस सेक्टर्सच्या कंपन्यांना २९,७४६ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. कृषीला मात्र १४,४८३ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. ४. २०२२-२३ : उद्योगांचे ७३,२७२ कोटी रुपये कर्ज माफ केले, तर शेती व संबंधित क्षेत्रातील २३,८५२ कोटी रुपये माफ केले. म्हणजेच अडीचपटीने उद्योगपतींचे कर्ज माफ झाले आहे. ५. २०२३-२४ : मोठ्या उद्योगांचे ४२,२१० कोटी रुपये कर्ज माफ करण्यात आले. शेती व इतर संबंधित व्यवसायांसाठी हा आकडा जवळपास निम्मा म्हणजेच २४,४२६ कोटी रुपये होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर