ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

लोककलावंतांच्या मानधनात वाढ करा- दशरथ धुमाळ:अधिवेशनात मागण्या मांडण्याची आ. जगताप यांना विनंती‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी लोककलावंतांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील लोककलावंतांच्या मागण्या आमदारांनी मांडाव्यात, अशी विनंती धुमाळ यांनी यावेळी केली. पारंपरिक लोककलावंतांची निवड इष्टांक ५०० पाचशे करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने आणि या जिल्ह्यात एकूण १४ तालुके असल्याने कलावंतांची निवड करण्यासाठी इष्टांक ५०० करावा आणि लोककलावंतांच्या मानधनामध्ये वाढ करून ते प्रतिमहा १० हजार रुपये करावे, असे धुमाळ यांनी निवेदनात म्हटले आहे. लोककलावंत हे भारतीय संस्कृतीचे रक्षक आहेत. पाऊसपाणी, ऊन वा थंडी अशा कोणत्याही ऋतूत ते आपल्या रोजीरोटीसाठी कला सादर करून संस्कृतीचे रक्षण करतात. यामधून त्यांना अत्यंत अल्प मानधन मिळते. त्यामुळे त्यांना शासकीय मदतीची आवश्यकता आहे. याचा सहानुभूतीने विचार करून शासनाने लोककलावंतांना मानधन वाढवून द्यावे, अशी आग्रहाची मागणी धुमाळ यांनी या निवेदनातून केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर