ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

घोडदरा येथील शेतकर्याच्या मुलीने मारली बाजी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५.४० % मार्क घेऊन अव्वल.

100 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

या आधी सुद्धा वर्ल्ड बुक रेकॉर्ड ऑफ लंडन सह अनेक रेकॉर्डवर कोरले गुंजने स्वतःचे नाव.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील छोट्याश्या गावांतील गुंजन वसंता मिलमिले हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५.४० %  गुण प्राप्त करून गावासह मारेगाव तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.गुंजन ही ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे शिकत असून गुंजनने वर्धा जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. व तीच्या नावे अनेक रेकॉर्ड्स असून २०२१ मद्ये  उच्च उंचीच्या वैज्ञानिक फुग्याच्या मदतीने “एकाच प्रक्षेपण साइटवर सर्वाधिक फेमटो उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

(प्रत्येकी 100 फेमटो उपग्रह वेगळ्या प्रयोगासाठी डिझाइन केलेले)”  डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन – हाऊस ऑफ कलाम आणि मार्टिन ग्रुप हे संपूर्ण भारतातील विद्यार्थी एकत्र करतात. या कार्यक्रमात गुंजन सुद्धा सहभागी झाल होती. हे उपग्रह 7 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम, भारत येथे प्रक्षेपित केले गेले.वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सह ,असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड रिसर्च फाउंडेशन, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, स्पेस ऑन ऑफ इंडिया यांच्याकडून गुंजन ला गौरविण्यात आलेले आहेत.

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील शेतकऱ्यांच्या मुलीने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.आई-वडील शेतकरी असून घरात कुणीही जास्त सुशिक्षित नसताना  देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या गुंजन चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.  गुंजन हे श्रेय आई वडीला सह शाळेतील प्राचार्य शिक्षक वृंद यांना देत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर