ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

चंद्रपूर हादरले!:निराधार गतिमंद महिलेवर नराधमाचा अत्याचार; पीडिता पाच महिन्यांची गर्भवती, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात महिला अत्याचाराच्या घटनामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातच माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातून समोर आली आहे. एका गतिमंद महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या अमानवीय कृत्यामुळे पीडित महिला पाच महिन्यांची गर्भवती राहिली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गतिमंद असून तिला बोलता येत नाही. आई-वडिलांच्या निधनानंतर ती गावात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एकटीच राहत होती. तिला कोणीही वाली नसल्याचे पाहून अज्ञात आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आशा सेविकांना लक्षात आली गोष्ट काही दिवसांपूर्वी गावातील आशा सेविका आणि स्थानिक महिलांना पीडितेच्या शारीरिक हालचालींवरून संशय आला. त्यांनी तातडीने तिला विश्वासात घेऊन शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तिथे झालेल्या वैद्यकीय तपासणीत ती महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले, ज्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. भिसी पोलिसात गुन्हा दाखल या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेच्या भावाने भिसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अज्ञात नराधमाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. अशा नराधमाला लवकरात लवकर अटक करून कठोर कायदेशीर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कांबळेची कबुली ऐकणारा ‘तो’ साक्षीदार पोलिसांत हजर! दुसरीकडे पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळेने 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचा खून केला. या घटनेनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, पोलिस कोठडीत तो तोंड उघडत नव्हता. कोर्टासमोरही त्याने निर्लज्जपणे असे सांगितले की, किरकोळ वादातून मला या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस साक्षी-पुरावे गोळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नराधम कांबळेने खुनाची कबुली नसरापूर गावातील एका व्यक्तीला दिली होती. माझी चूक झाल्याचे सांगत, मी मुलीला मारले असल्याचे त्याने संबंधित व्यक्तीला सांगितले. या साक्षीदाराने ही अत्यंत महत्त्वाची पोलिसांना दिली आहे. दरम्यान, नराधमाच्या पोलिस कोठडीत 12 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर