ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

औंढ्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला शिवागीळ:पदोन्नतीवरून झाला वाद, अंगणवाडी मदतनीसावर अदखलपात्र गुुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


औंढा नागनाथ येथे पदोन्नतीच्या कारणावरून बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेस शिवीगाळ करून शासकिय कामास मज्जाव करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० सायंकाळी अदखलपात्र गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील अंगणवाडीमध्ये मागील १० वर्षापासून कल्पना यंबल ह्या मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदोन्नतीसाठी पात्रताधारण केल्यांनतर काही दिवसांपुर्वी पदोन्नतीचा प्रस्ताव औंढा नागनाथ बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ तालुक्यात पदोन्नतीसाठी पद रिक्त झाल्यानंतर तातडीने पदोन्नती दिली जाईल असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे यंबल यांना जागा रिक्त होण्याची प्रतिक्षा लागली होती. दरम्यान, सोमवारी ता. २० दुपारच्या सुमारास बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे ह्या काम करीत बसल्या होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका कल्पना तेेथे आल्या त्यांनी मला पदोन्नती का देत नाही असे म्हणत त्यांच्यासोबत वाद सुरु केला. यावेळी प्रकल्प अधिकारी इंगळे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जागा रिक्त झालेली नाही त्यामुळे थोडे थांबा असे म्हटल्यानंतर कल्पना यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी कल्पना यांनी प्रकल्प अधिकारी संगिता इंगळे यांना शिवीगाळ करून काम करण्यास मज्जाव केला. या प्रकरणी संगिता इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी कल्पना यंबल यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. जमादार पठाण, दिलीप नाईक पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर