ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

जीएसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कापूरवाडी तलावातून उपसला दीड टन कचरा:जीएसटी दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गोळा केल्या 22 गोण्या प्लास्टिक

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


९ व्या जीएसटी दिना’चे औचित्य साधून वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपताना एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक आणि जैवविविधतेने नटलेल्या कापूरवाडी तलाव परिसरात गुरुवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जीएसटीच्या टीमने या मोहिमेदरम्यान तलाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा, काचा, कपडे, तसेच सण-उत्सवानंतर विसर्जित केलेले निर्माल्य आणि मूर्तींचे तब्बल २२ गोण्या (सुमारे दीड टन) अवशेष गोळा केले. गोळा केलेला हा सर्व कचरा पुढील प्रक्रियेसाठी आणि पुनर्वापरासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला.कापूरवाडी तलाव देशात नवव्या क्रमांकावर!या मोहिमेचे मुख्य आयोजक आणि राज्यकर निरीक्षक तुषार लहारे यांनी कापूरवाडी तलावाचे महत्त्व सांगताना माहिती दिली की, दरवर्षी जागतिक पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ या उपक्रमात कापूरवाडी तलावाच्या परिसरात तब्बल १५६ वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. या कामगिरीमुळे हा तलाव संपूर्ण भारतात नवव्या क्रमांकावर राहिला आहे. हिवाळ्यात येथे अनेक परदेशी व स्थलांतरित पक्षी येतात, त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. या मोहिमेत सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे, संतोष उंदरे, राज्यकर निरीक्षक तुषार लहारे, तसेच पर्यावरणप्रेमी अमित गायकवाड, संदेश कपाळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “नागरिकांनी देवाच्या मूर्ती आणि निर्माल्य तलावात न टाकता पर्यावरणपूरक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन यावेळी महिला अधिकाऱ्यांनी केले. तसेच, यापुढे स्वतः प्लास्टिकचा वापर मर्यादित करू आणि इतरांनाही निसर्गाची हानी करण्यापासून रोखू, अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. मंगळवारी चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता मोहीम ३० जून रोजी सकाळी ६ वाजता अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक चांदबिबी महाल येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महामार्ग ते चांदबिबी महालापर्यंतचा परिसर प्लास्टीकमुक्त करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे हे “जगण्याचा पासवर्ड करूया” यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर १ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयेाजन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर