ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ!:IAS तुकाराम मुंढेंचा मोर्चा शिर्डीकडे, FDA पथकाची धडक कारवाई; भेसळखोरांचे धाबे दणाणले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


साईबाबांच्या शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी प्रसादाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. मंदिर परिसरातील शेकडो दुकानांमध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. काही भाविकांनी बुरशीयुक्त पेढ्यांबाबत तक्रारी केल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासन तातडीने खडबडून जागे झाले असून त्यांनी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत शिर्डीत या दुकानांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. शिर्डीमध्ये दररोज हजारो आणि वर्षाकाठी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात आणि मंदिराबाहेरील खाजगी दुकानांमधून श्रद्धेने प्रसादाची खरेदी करतात. मात्र, या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढ्यांवर ना पॅकेजिंगची तारीख असते, ना ‘एक्सपायरी डेट’ दिलेली असते. शिवाय, हे पेढे नेमके कुठे आणि कोण बनवते, याचाही कोणताही उल्लेख पाकिटांवर नसतो. अनेक वर्षांपासून भाविकांना अक्षरशः दगडासारखे कडक आणि पाकिटात बुरशी लागलेले पेढे प्रसादाच्या रूपात विकले जात असल्याचा भयंकर प्रकार आता उघड झाला आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे भक्तांच्या आरोग्याशी खेळ प्रसादाच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे लाखो साईभक्तांच्या जिवाशी थेट खेळ सुरू आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे शिर्डी नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासनाचे आतापर्यंत पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. श्रद्धेच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या या निकृष्ट आणि बुरशीयुक्त प्रसादावर भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे भक्तांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा जीवघेणा खेळ नेमका कधी थांबणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर, शिर्डीत साईभक्तांना प्रसादाच्या नावाखाली बुरशीयुक्त पेढ्यांची विक्री होत असल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त होताच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. या तक्रारींनंतर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष पथक तातडीने शिर्डीत दाखल झाले असून, त्यांनी या धक्कादायक प्रकाराविरोधात थेट ॲक्शन मोडमध्ये येत कारवाईला सुरुवात केली आहे. भेसळखोरांचे धाबे दणाणले या धडक कारवाईअंतर्गत साई मंदिर परिसरातील प्रसादाच्या दुकानांवर पथकाकडून छापेमारी सुरू असून, संशयित पेढ्यांचे नमुने गोळा केले जात आहेत. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत सखोल तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, अहवालात दोष आढळल्यास संबंधित पेढा उत्पादकांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सध्या प्रसाद विक्रेत्यांकडून या पेढ्यांच्या मूळ उत्पादकांची सविस्तर माहिती काढली जात असून, प्रशासनाच्या या आक्रमक पावलांमुळे शिर्डी परिसरातील भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर