ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नाना पटोलेंच्या घरी भाजप नेत्यांचा पाहुणचार:मैदानावर खेळाडू भिडले अन् सुकळीत ‘राजकीय मेजवानी’ झडली

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्याच्या राजकारणात सध्या खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा नेत्यांच्या ‘डायनिंग टेबल’वरील चर्चेने अधिक धुरळा उडवून दिला आहे. लाखांदूर तालुक्यातील कोच्छी दांडेगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील दिग्गज नेते व एकमेकांचे राजकीय विरोधन एकाच मंचावर आले होते. मात्र, या कार्यक्रमानंतर साकोलीचे आमदार यांच्या सुकळी येथील निवासस्थानी भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, काँग्रेस आमदाराच्या भाजपा पक्ष हिच तर नांदी नाही ना..? अशा चर्चेला उधाण आले आहे. दि. ​३१ जानेवारी २०२६ रोजी कोच्छी दांडेगाव येथे क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, विधानपरिषद आमदार डॉ. परिणय फुके, काँग्रेस नेते नाना पटोले आणि खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री भोयर आणि आमदार फुके यांनी थेट नाना पटोले यांच्या सुकळी येथील घरी जाऊन भोजन केले असल्याची चर्चा रंगत आहे. ​एकीकडे नाना पटोले हे भाजपवर सडकून टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर दुसरीकडे खुद्द भाजपचे महत्त्वाचे नेते त्यांच्या घरी भोजनासाठी जातात, यामुळे साकोलीच्या गल्लीबोळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात नाना पटोले भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या अफवांना या घटनेमुळे नवे बळ मिळाले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पाहुणचार घेणे हा महाराष्ट्राचा राजकीय संस्कृतीचा भाग असला तरी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ‘लंच डिप्लोमसी’चे अर्थ वेगळे काढले जात आहेत. कट्टर विरोधक जेव्हा अशा प्रकारे एकत्र जेवण करतात, तेव्हा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हे या मेजवानीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. मात्र, हे जेवण केवळ मैत्रीचे आहे की मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी, हे येणारा काळच ठरवेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर