मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव निमित्ताने गौरवोदगार.
क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघाचा पुढाकार.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
हमखास यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मेहनत आणि चिकाटी कधीच सोडू नये. हे दोन गुण जर अंगी असले तर कोणत्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी उत्तुंग भरारी मारू शकतो असे गौरवोदगार ज्येष्ठ नकलाकार तथा प्रा. दिलीप अलोणे यांनी काढले. ते क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष राकेश खुराणा होते.विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. या विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहे. अति गुण मिळवण्यासोबतच विद्यार्थ्याने माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी ज्ञान नक्कीच वाढवले पाहिजे. विद्यार्थ्यांची गुणासोबत गुणवत्ताही वाढली पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना शेतकरी मात्र समृद्ध झाला नाही याची खंत वाटते असेही उदगार दिलीप अलोणे यांनी काढले.
दुसरे प्रमुख वक्ते म्हणून असलेले प्रा. सतीश पांडे यांनी विद्यार्थ्यांना आधी मी कोण आहे? याचा अभ्यास करा. पुस्तकी ज्ञान म्हणजे यश नव्हे असेही ते म्हणाले. यशाचा मार्ग हा खडतर परिश्रमातून जातो असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, माजी प्राचार्य भास्करराव धानफुले,नगरसेवक नंदेश्वर आसूटकर, वैभव पवार, अनिल गेडाम, ठाणेदार राजेश पुरी, वनपरीक्षेत्र अधिकारी शंकरराव हटकर, प्रिया वानखेडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रा. रु. मारेगाव, सरपंच संघटनेचे राज्य सदस्य अरविंद ठाकरे, शीतल पोटे, गाडगे, कांबळे, होते.
यावेळी तालुक्यातील प्रत्येक शाळेतून वर्ग 10 वी आणि 12 वी मधून प्रथम आलेल्या 42 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह तसेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पुस्तक भेट देऊण गौरविण्यात आले. पाऊस सुरु असतांनाही विद्यार्थी तसेच पालकांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत यांनी, प्रास्ताविक माणिक कांबळे आणि आभारप्रदर्शन आनंद नक्षणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना, आणि मारेगाव तालुका पत्रकार संघटनेचे सुमित हेपट,भास्कर राऊत,मोरेश्वर ठाकरे, माणिक कांबळे, सुरेश नाखले, सुरेश पाचभाई,गजानन देवाळकर, भैय्याजी कनाके, आनंद नक्षने,धनराज खंडरे, गजानन आसूटकर, सुमित गेडाम, रोहन आदेवार यांनी परिश्रम घेतले.