मारेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या.
रामेश्वर येथील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात :- एकामगोमाग होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र संपतांना दिसत नाही. सकाळी झालेल्या आत्महत्येची शाई वाळते न वाळते तोच दुपारी पून्हा एक आत्महत्या झाल्याने तालुका पुरता हादरून गेलेला आहे.सचिन सुभाष बोढेकर सुमारे वय 28 वर्षे,असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील रामेश्वर येथील राहिवासी होता.
सचिन आपल्या आई वडिलांसोबत रामेश्वर येथे राहायचा.त्यांना सुमारे दोन एकर शेती असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.तो आपल्या वडिलांसोबत राहून शेतीमध्ये मदत करायचा.परंतु यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडलेले आहे.साधा लागवडीचा खर्च सुद्धा निघायची वेळ नसल्याने शेतकरी हवालदिल झाला.
अशाच अवस्थेत असलेल्या सचिनने आज दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोज मंगळवाला दुपारचे वेळेस आईवडील शेतामध्ये गेले असताना तो घरी एकटाच असतांना विषारी कीटकनाशक प्राशन केले याची माहिती गावकरी आणि घरच्यांना व्यक्तींना मिळताच त्याला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तालुक्यात चार दिवसात ही पाचवी आत्महत्या झाल्याने तालुक्यात काय चाललेले आहे. असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित होतांना दिसत आहे.सचिन हा अविवाहित असून त्याच्या मागे आई,वडील,एक बहीण असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार राजु टेकाम करीत आहेत.


