वीज पडून बैल ठार.

0
80

अडेगांव शेतशिवातील घटना.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील अडेगांव येथील शेतशिवात आज दिनांक 31ऑगस्ट रोज बुधवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास वीज पडून बैल ठार झाल्याची घटना अडेगांव शेतशिवारात घडली आहे .

जवळपास १५ ऑगस्ट पासून तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.त्यामुळे अनेक दिवसापासून पावसाने खोळंबलेल्या मशागतीच्या कामाला पुन्हा वेग आला आहे.गंगाधर बाधे ह्या शेतकऱ्याचे डवरणचे काम सुरु असतांना आज अचानक आकाशात ढग डाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाल्याने शेतकरी काम बंद करून बैल बांधावर बांधून घरी आले.

असता बांधलेल्या बैल जोडी तील एक बैलावर विज कोसळून बैल जागीच ठार झाला.ऐण शेतीच्या हंगामाच्या काळात बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच अति पावसाने खरीप हंगाम धोक्यात आला असतांनाच आणखी एक नवीन संकट शेतकऱ्यां पूढे ठाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here