बोरी (गदाजी ) येथील शेतकरी पुत्राची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

0
80

बोरी (गदाजी ) येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी ) येथील एका 43 वर्षीय शेतकऱ्याच्या पुत्राने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पुंडलिक मारोती रुयारकर वय 43 रा. बोरी (गदाजी ) असे आत्महत्या केलेल्या विवाहीत शेतकऱ्याच्या पुत्राचे नाव असून पुंडलिक हा दिनांक 31ऑगस्ट 2022 रोज बुधवारला रात्री 9 वाजताच्या सुमारास घरून कोणाला न सांगता निघुन गेला होता. रात्री घरच्यांनी गावात शोध घेतला पण तो दिसला नाही अशी माहिती सूत्रांन कडून प्राप्त झाली आहे.आज दिनांक 1 सप्टेंबरला सकाळी घरचे काही व्यक्ती शेतात गेले असता त्यांना पुंडलिक यांनी स्वताच्या शेतात विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आल्याने घटना उघकीस आली.

पुंडलिक यांच्या वडिलांच्या नावाने बोरी (गदाजी ) येथे 3 एकर शेती आहे. अतिवृष्टी मुळे झाल्येल्या नुकसानी मुळे आणि दोन वेळा झालेला पुर बुडाई मुळे चिंतेत असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले असुन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे.

मृतक शेतकरी पुत्राच्या पश्चात वृद्ध आई,वडील,पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार राजु टेकाम, विनेश राठोड करीत आहेत.





Previous articleवीज पडून बैल ठार.
Next articleझरी तालुक्यात मिरची लागवड क्षेत्रात वाढ.
सुरेश पाचभाई
मुख्य संपादक Phone: 9922862184 SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या, सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा, कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित जनते पर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे. " घडावा देश, हाची उद्देश , ....... आवाज जनतेचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here