झरी तालुक्यात मिरची लागवड क्षेत्रात वाढ.

0
94

पाऊस कमी होताच रोप लावणीला वेग.

अति पावसाने रोपे सडल्याने रोपांच्या दरात वाढ.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]


झरी तालुक्यात खरीप हंगामात मोठ मोठ्या प्रमाणात कापूस, तूर ,सोयाबीन या पिकांची लागवड केली जाते.विशेषतः कपसीची जास्त प्रमाणात लागवड केली जात असत . ओलीताचे साधन असणारे शेतकरी रोहणी नक्षत्रातच लागवड करून मे महिन्यांपर्यंत कापूस काढत असत.परंतु गेल्या तीन – चार वर्षात कपासी वरिल लाल बोंड अळीच्या वाढत्या प्रकोपामुळे तालुक्यातील शेतकरी मिरची पिकाकडे वळले आहेत.यावर्षी जवळपास साडेपाचशे हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली जात असल्याचे तालुका कृषी विभागाचा अंदाज आहे.

सध्या मिरची लागवडीचे काम जोमात सुरू आहे जास्त पाऊस पडत असल्याने लागवडी साठी थोडा उशीर होत आहे.जून महिन्यात रोपे तयार करून त्याची पाणी ,खत फवारणी या मशागत करून लागवडीसाठी तयार करण्यात येते.मिरची बियाणे महाग असून ही रोप नाजुक असुन त्याची चांगली काळजी घ्यावी लागते.सतत पडणाऱ्या पावसाने रोप सडले त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

रोपे खराब झाल्याने रोपांची मागणी वाढली आहे.एका रोपाला दीड ते दोन रुपये मोजावी लागत आहे.एकरी बारा ते तेरा हजार रोपाची लागवड करावी लागते.सुरुवाती पासून किमान एक दीड लाख रुपये खर्च येतो.एकरी उत्पादन तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.गेल्यावर्षी नागपूर मार्केट ला लाल व वाळलेल्या मिर्चीला सरासरी १५ हजा रू प्रति क्विंटल दर मिळाला होता.

त्यामुळे गेल्या वर्षीचा अनुभव पाहता बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी गेल्या वर्षी च्या तुलनेत लागवड वाढवली आहे.चांगला नफा देणारे पिक म्हणून पिक म्हणून शेतकरी या पिकाकडे वळले आहेत . असे असले तरी भरपूर पाणी,वेळेवर खत,फवारणी,मशागत खूप मेहनत गरज आहे.निश्चितच मेहनतला निर्सगाची साथ मिळली तर मिरची पिक भविष्य उज्ज्वल करेल यात शंका नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here