गटविकास अधिकारी मारेगांव मार्फत
जिल्हाधिकारी यांना निवेदन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव: पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात यावा. तसेच गरीब आणि विधवा महिला यांना या यादीमध्ये प्रकर्षाने स्थान देण्यात यावे अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन पहापळ येथील विधवा महिला श्रीमती निर्मला गणपत कचवे यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोज शुक्रवारला गटविकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
श्रीमती निर्मला गणपत कचवे मौजा पहापळ येथील रहीवासी असुन ती विधवा महीला आहे. आणि तिचे नाव पहापळ ग्रामपंचायतच्या घरकुल प्रतिज्ञा यादीवर अनु क्र. १२ असून तिला अजून पर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नाही.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने या महिलेचे घर पूर्णपणे पडले आहे. त्यांची परिस्थीती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ती स्वतः घर बांधु शकत नाही. त्यामूळे आज त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव यांचे मार्फत जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले.

त्यामध्ये यादी ड नुसार घरकुल योजनेचा लाभ द्यावा. अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी श्रीमती निर्मला गणपत कचवे यांचे सह गावातील नागरीक हजर होते.