ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

2 वर्ष शारीरिक संबंध, मंगळसूत्र बांधूनही लग्नाला टाळाटाळ, ब्युटीशियनने फसवणूक झाल्याचे कळताच थेट…

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‎छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आश्वासन देत 28 वर्षीय ब्युटीशियन तरुणीसोबत दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवले. लग्नाबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून आणि कपाळावर सिंदूर भरत पुन्हा विश्वास संपादन केला. मात्र, अखेर लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर तरुणीशी संपर्कच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सौरभ शिवलाल मेहेर (रा. रामनगर, मुकुंदवाडी) याच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात शनिवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 26 ऑगस्ट 2024 ते 28 जुलै 2026 या कालावधीत रामनगर परिसरात ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 28 वर्षीय तरुणी ब्युटीशियन म्हणून काम करते. काही वर्षांपूर्वी तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने ब्युटिशियनचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या निमित्ताने तिची सौरभ मेहेर याच्याशी ओळख झाली. पुढे सौरभने तिच्यासोबत भेटीगाठी वाढवल्या. मैत्रीच्या नावाखाली जवळीक वाढवत त्याने काही दिवसांतच तिच्यासमोर प्रेम व्यक्त केले.

‎26 ऑगस्ट 2024 रोजी सौरभ तरुणीच्या घरी गेला होता. त्यावेळी तुझा आता घटस्फोट झाला आहे, मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह धरला. लग्न करण्याचे आश्वासन देत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

‎दरम्यान, तरुणीने जेव्हा जेव्हा सौरभकडे लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने वेगवेगळी कारणे सांगून लग्न पुढे ढकलले. सुमारे वर्षभरानंतर ऑगस्ट 2025 मध्ये तरुणीने पुन्हा त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. लग्न होत नसल्याने ती संतप्त झाली. त्यावेळी सौरभने तिच्याच घरात तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि कपाळावर सिंदूर भरला. मी तुझाच आहे, तुला सोडून जाणार नाही. योग्य वेळ आली की आपण घरी सर्वांना सांगून टाकू, असे सांगून त्याने पुन्हा तिच्यासोबतचे संबंध कायम ठेवले.

‎मात्र, 28 जुलै 2026 रोजी सौरभ आणि तरुणीमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यावेळी सौरभने तरुणीला आणखी एक महिन्याची मुदत देण्यास सांगितले. मी लग्न करतो, असे आश्वासनही त्याने दिले. मात्र, त्यानंतर त्याने तरुणीचे फोन घेणे आणि तिच्या मेसेजला उत्तर देणे पूर्णपणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सौरभ शिवलाल मेहेर याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर