ब्रेकिंग न्यूज
⚡ Government Employees News | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, सणासाठी मिळणार 20 हजार रुपये ✦ ⚡ 61 तासांच्या संघर्षानंतर अखेर तोडगा! राजू शेट्टींची मोठी घोषणा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार? ✦ ⚡ बंद फ्लॅट हेरले, कटरने कड्या कापल्या अन् एकाच रात्रीत…, छ. संभाजीनगरात चोरट्यांचा धुमाकूळ ✦ ⚡ हॉटेलमध्ये जेवन केलं, बाहेर येताच काळानं गिळलं, मित्राला वाचवायला गेला अन्…, सांगलीत हळहळ ✦ ⚡ एल निनोच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी धामणीत वनराई बंधाऱ्याची उभारणी! ✦ ⚡ सोलापूरच्या इंजिनिअरचा पैशांचा फॉर्म्युला, कोंबड्यांसोबत पाळले बदक, महिन्याची कमाई अडीच लाख, Video ✦ ⚡ आधी भरधाव चारचाकीनं मुलीला चिरडलं, आता ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणाच्या विकृत कृत्यानं कोल्हापुरा… ✦ ⚡ काँग्रेसच्या महिला खासदाराला बसमध्ये मारली चापट, खासदार श्यामकुमार बरवेंकडून धक्कादायक प्रकार, VIDEO व्हायर… ✦ ⚡ पतीचा छळ असह्य, आधी विष केलं प्राशन, नंतर गॅलरीतून उडी , विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, ‎‎छत्रपती संभाजीन… ✦ ⚡ ST Workers Protest | एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा! प्रमुख मागण्या काय?
SP News Maregaon

बंद फ्लॅट हेरले, कटरने कड्या कापल्या अन् एकाच रात्रीत…, छ. संभाजीनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‎छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही काळात छ. संभाजीनगरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. बंद घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी तीसगाव येथील म्हाडा कॉलनी परिसरात धुमाकूळ घातला. राज स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमधील एकाच रात्री सहा बंद फ्लॅट आणि रो-हाऊसमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर बंद घरांची पाहणी करत कटरच्या साहाय्याने दरवाजांच्या कड्या कापून घरांमध्ये प्रवेश केला आणि लाखोंचा ऐवज लंपास केला.

‎राज स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमधील डी-1 इमारतीत राहणारे शानसिंह भाटी हे कुटुंबीयांसह पुण्याला गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाची कडी कापून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या आणि तीन हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला. याच इमारतीतील डी-103 क्रमांकाच्या फ्लॅटचीही कडी कापण्यात आली. मात्र, हा फ्लॅट रिकामा असल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.

पतीचा छळ असह्य, आधी विष केलं प्राशन, नंतर गॅलरीतून उडी , विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, ‎‎छत्रपती संभाजीनगरमधील घटना

‎चोरट्यांनी त्यानंतर डी-2 इमारतीतील फ्लॅट क्रमांक 112 ला लक्ष्य केले. या फ्लॅटमध्ये राहणारे अनिल लकारे हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप फोडून मुलांच्या बचतीच्या डब्यात ठेवलेले पाच ते सहा हजार रुपये तसेच सुमारे दहा ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दोन अंगठ्या चोरून नेल्या. याबाबत लकारे यांच्या नातेवाइकांनी माहिती दिली.

‎याशिवाय बी-203 क्रमांकाच्या रो-हाऊसच्या दरवाजाचीही कडी तोडण्यात आली. या रो-हाऊसमध्ये राहणारे साठे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने तेथून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचप्रमाणे डी-1 इमारतीतील फ्लॅट क्रमांक 114 आणि डी-2 इमारतीतील फ्लॅट क्रमांक 104 यांच्याही दरवाजांच्या कड्या चोरट्यांनी तोडल्या. या दोन्ही फ्लॅटमधील रहिवासी जोशी आणि शेळके हे बाहेरगावी असल्याने घरातील सामानाची पाहणी झाल्यानंतर चोरीला गेलेल्या मुद्देमालाची माहिती समोर येणार आहे.

‎दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपार्टमेंट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये तीन संशयित चोरटे कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाच अपार्टमेंटमधील अनेक बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर