ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं…
SP News Maregaon

Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


टिटवाळा: मालमत्तेच्या हव्यासापोटी एका मुलाने आपल्याच जन्मदात्या वडिलांवर आणि सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना मंगळवारी रात्री उशिरा टिटवाळ्यानजीकच्या गुरवलीपाडा येथे घडली. ७० लाखांच्या हिस्स्यासाठी झालेल्या या वादानंतर आरोपी मुलाने गोळ्या झाडत वडिलांना आणि भावाला रक्ताच्या थारोळ्यात पाडले.

या हल्ल्यात बाळाराम शेलार (५५) आणि त्यांचा मोठा मुलगा भरत शेलार (३७) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात अतिदायित्व विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. कल्पेश शेलार (३५) असे या हल्लेखोर मुलाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश हा त्याची पत्नी रसिका आणि मुलांसह टिटवाळ्यात वेगळा राहत होता. काही दिवसांपूर्वीच वडील बाळाराम यांनी कुटुंबाची एक सामायिक मालमत्ता विकली होती. या व्यवहारातून आलेले ७० लाख रुपये आपल्यालाच मिळावेत, असा हट्ट कल्पेश धरून बसला होता. मात्र, वडिलांनी मोठा मुलगा भरत याला मालमत्तेत अधिक हिस्सा दिल्याने कल्पेशच्या मनात राग होता.

मंगळवारी रात्री उशिरा कल्पेश आपली पत्नी रसिकासह वडिलांच्या घरी पोहोचला. मालमत्ता विकूनही हिश्श्याची रक्कम का दिली नाही, यावरून त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापलेल्या कल्पेशने सोबत आणलेल्या बंदुकीतून वडील बाळाराम आणि भाऊ भरत यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेवाळीतून अटक
घटनेनंतर आरोपी कल्पेश आणि त्याची पत्नी रसिका घटनास्थळावरून फरार झाले होते. टिटवाळा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोघांनाही नेवाळी येथून बेड्या ठोकल्या. कल्याण न्यायालयाने त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय कोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर