मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असताना शासना कडून कुठलीही मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने काल दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोज मंगळवारला तहसील कार्यालया समोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी, संघटक सुनील गेडाम, यांनी केले, या एकदिवशीय आंदोलनात विविध मागण्याचे निवेदन तहसीदार दीपक पुंडे यांना देण्यात आले.विविध मागण्या मध्ये पुरपीडिताना तात्काळ सानुग्रह अनुदान मिळावे, पुरपीडिताना त्यांच्या शेतीपिकाच्या नुकसानी प्रमाणे मोबदला मिळावा,एकोना कोळसा खादानीमुळे नदीपात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे नदीपात्रा बाहेर पुराचे पाणी वाहून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
त्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण होऊन उपाययोजना कराव्या, दिंडोरा प्रकल्प ग्रस्ताचे पुनर्व्हसन करावे, अतिवृष्टी ग्रस्ताना त्वरित मोबदला मिळावा, शेत पादन रस्ते योजनेची अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्याचा समावेश होता. हे आंदोलन यशस्वीते साठी मयूर ठाकरे, मोहन जोगी, अजय आसुटकार,पुरुषोत्तम बुटे, शरद ताजने,सुभाष बदकी, अभय चौधरी, किसन मत्ते, अनंता निब्रड जीवन काळे,यासंह अनेक शिवसैनिकानी प्रयत्न केले.