पुरपीडितांच्या शेतात जाऊन तात्काळ सर्वेक्षण करण्याचे दिले आदेश.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगांव तालुक्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबियांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यात त्यांनी शासनातर्फे मिळणारी आर्थिक मदत तात्काळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच जनतेने आत्महत्यासारखे पाऊल न उचलता निर्भयपणे जीवन जगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
मारेगाव तालुक्याची ओळख ही आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून होऊ लागलेली आहे.या तालुक्यात दर आठवड्याला आत्महत्या या ठरलेल्या आहे.मागील काही दिवसातील आत्महत्यांचे आकडे हे तर बुचकाळ्यात टाकणारे होते.त्यामुळे या आत्महत्या केलेल्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट डॉ. अमोल येडगे यांनी घेतली.
तसेच शासनातर्फे मिळणारी आर्थिक मदत तात्काळ मिळवून देण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी त्यांनी दिले. ते तालुक्यातील बोरी, शिवणी धोबे, दांडगाव, पांढरकडा(पिसगाव)येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियांच्या घरी भेट तसेच पुरबुडीत क्षेत्राच्या पाहणी दौऱ्यावर होते.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी तिन्ही गावांमध्ये तेथील ग्रामपंचायत कार्यालयात संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चांगलीच खरडपट्टी काढली.यावेळी जिल्हाधिकारी यांनी आत्महत्या थांबविण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीशाळेवर चर्चा करावी.
आत्महत्या हा पर्याय नसून विचारपूर्वक पाऊल उचलले तर आत्महत्या करण्याची वेळ येत नाही असे म्हटले.यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचारी यांची शाळा घेत अतिवृष्टी, पीकविमा, पी. एम.किसान योजना, ई केवायसी करणे, तसेच अतिवृष्टीने किती नुकसान झाले, किती शेतीचा सर्वे केला, पीकविमा मिळण्यासाठी किती अर्ज आले.
किती हेक्टर शेतीमध्ये गाळ साचला होता. या सर्वांची माहिती घेतली. यातून पात्र शेतकरी सुटू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ही माहिती देतांना कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच भांबेरी उडाली होती.या भेटीदरम्यान त्यांनी मार्डीजवळील बोदाड येथील फुलशेतीलाही भेट दिली.
शिवणी ग्रामपंचायतने दिले गाव पुनर्वसनासाठी निवेदन.
शिवणी या गावाला यावर्षी तीन वेळा पुराने वेढा दिला होता. गावातील अंदाजे 480 हेक्टर जमिनीपैकी 375 हेक्टर जमीन पाण्याखाली होती. 150 हेक्टर जमिनीवर गाळ साचला. बाजूलाच कोलमाईन्स आहे. गावाचाही कोलमाईन्ससाठी सर्वे झालेला आहे. त्यामुळे गावाचे पुंनर्वसन कानडा या गावाजवळील शेतजमिनीवर करावे असे निवेदन यावेळी सरपंच काटवले आणि उपसरपंच पांडुरंग लोहे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.