ब्रेकिंग न्यूज
⚡ किती सोसायचं? ‘तो’ रोज दारू पिऊन यायचा अन्…, 30 वर्षांच्या शीतलचं टोकाचं पाऊल, बीडमध्ये खळबळ ✦ ⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी ✦ ⚡ रब्बी हंगामासाठी पाणी हवेय? शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक, अन्यथा पिकांना बसू शकतो फटका ✦ ⚡ Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म… ✦ ⚡ डेटिंग ॲपवर ओळख, आधी संबंध ठेवले, मग महिलेनं केलं भयंकर कांड , छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना ✦ ⚡ IND vs ZIM : 54 बॉलमध्ये नुसती मॅच जिंकली नाही तर केला रेकॉर्ड, स्मृतीच्या कॅप्टन्सीत पहिलाच मालिका विजय ✦ ⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी ✦ ⚡ मध्यरात्रीची वेळ, अनोळखी स्पर्श पाहून शेतकऱ्याची पत्नी ओरडतच उठली, त्यानं तोंडात बोळा कोंबला अन्…, सोलापू… ✦ ⚡ News 18 Marathi Headlines | 17 OCT | 9 AM | Abhijit Dipke | Fadnavis | Sanap | Maharashtra Politics
SP News Maregaon

‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Pradeep Purnekar Murder Case: शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळा पूर्णेकर यांच्या हत्ये प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या हत्या प्रकरणाला एक नवं आणि गंभीर वळण लागलं आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्यानंतर आता कुटुंबातील एका तरुणीला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘आता पुढचा नंबर तुझा’ अशा आशयाची धमकी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट समोर आला आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप पूर्णेकर यांची पुतणी खुशबू हिला सोशल मीडियावरील मेसेजद्वारे थेट ‘नेक्स्ट तू’ (Next You) अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या उघड धमकीमुळे पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण ठाणे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी कुणी आणि कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

दरम्यान, शुक्रवारी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मृत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी भेट घेतली. या भेटदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत सर्व हकिकत सांगितली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना धीर देत, "काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत," असा ठोस विश्वास दिला. तसेच कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

तसेच शनिवारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील पूर्णेकर कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीदरम्यान संतप्त कुटुंबाने शिंदेंसेनेसंदर्भात तीव्र रोष व्यक्त केला आणि या हत्येप्रकरणी शिंदेंसेनेतर्फे असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना पदावरून तत्काळ हटवण्यात यावं, अशी मागणी केली.
शिंदे दाम्पत्याच्या अडचणीत वाढ
२९ सप्टेंबर २०२६ रोजी मानपाडा परिसरात प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली असली, तरी पूर्णेकर कुटुंबीयांनी थेट माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर