ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू:फॉर्च्यूनरचा अक्षरशः झाला चेंदामेंदा; संभाजीनगरच्या सुपुत्राचा दुर्दैवी अंत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात असताना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील मनोरजवळ झालेल्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी शिवाजी पाटील (वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला. मनोरजवळील दुर्वेश गावाच्या हद्दीत त्यांची भरधाव फॉर्च्युनर कार एका अवजड वाहनावर पाठीमागून आदळल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत संभाजी पाटील यांनी प्राण गमावले असून, त्यांचा सहकारी यश प्रशांत चौधरी (वय 22) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर येथील दुर्वेश गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांचा मित्र प्रणय प्रशांत चौधरी याने आपली भरधाव कार दुसऱ्या मार्गिकेतून पहिल्या मार्गिकेत घेताना समोरच्या ‘हायवा’ ट्रकचा अंदाज न आल्याने ही जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत संभाजी पाटील यांनी प्राण गमावले असून, कार चालक प्रणय चौधरी हा गंभीर जखमी झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार अंत्यसंस्कार अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आणि मनोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र रुग्णालयात नेले असता आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांना मृत घोषित करण्यात आले, तर जखमी प्रणय यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पाटील यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मनोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गाडीचे फक्त चाकच उरली मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील मनोरजवळ झालेल्या एका भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने क्रीडा विश्वातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात असताना दुर्वेश गावाच्या हद्दीत त्यांची भरधाव फॉर्च्युनर कार एका अवजड वाहनावर पाठीमागून जोराने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचे बोनेट आणि इंजिनचा भाग अक्षरशः चिरडला जाऊन पूर्णपणे नष्ट झाला असून, अपघातस्थळी केवळ कारचा मागील भाग आणि चाकेच शिल्लक उरल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर