ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

राऊतांचं ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर व्याख्यान देण्यासारखं!:शरद पवार या वयातही फिरतात, पण ठाकरेंना घराबाहेरच पडायचं नसतं- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शरद पवार या वयातही राज्यभर फिरतात, सभा घेतात. परंतू या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का? ते घराबाहेर पडून सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात एखादी सभा घेणार आहेत का? त्यांना घराबाहेरच पडायचे नसते. शरद पवार या वयातही आंदोलन करतील, मोर्चे काढतील. राऊत भांडूपच्या बाहेर जावू शकत नाहीत, असे म्हणत राऊतांच्या राजकीय मर्यादांवरही त्यांनी उपरोधिक टीका केली. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगावे की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी नेमकी कोणी केली. हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी बेईमानीवर बोलू नये. महाराष्ट्राने मतदानातून आपला कौल दिला आहे, असे बन यांनी म्हटले आहे. राऊतांनी स्वतःच्या राजकारणाचा विचार करावा नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘गोलपीठा’ झाल्याचा आरोप करणारे संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या राजकारणाचा विचार करावा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले लोक आज महाराष्ट्राला नैतिकतेचे धडे देत आहेत. विचार विकून सत्ता मिळवणाऱ्यांनी राजकीय अधःपतनावर बोलू नये.उबाठा गट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरला आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे. उबाठाने भविष्याची चिंता करायची गरज आहे. उबाठानेच दलाली करण्याची सुरूवात केली आहे. राऊतांचे ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर व्याख्यान देण्यासारखे आहे.
फुटला उद्धव ठाकरेंच अपयशी नेतृत्व कारणीभूत नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटातील पक्षफुटीसाठी भाजप जबाबदार नसून नेतृत्वाचे अपयश कारणीभूत आहे. उद्धव ठाकरे, राऊत आणि उबाठाचे नेते कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांना भेटत नाही संवाद साधत नाहीत आणि पक्ष फुटला म्हणून इतरांना दोष देतात. हे आता चालणार नाही, शिवीगाळ करण्यापलीकडे संजय राऊत यांच्याकडे कोणताही राजकीय कार्यक्रम उरलेला नाही. उबाठाने हिंदुत्व स्वीकारावे नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कुणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. 2019 पासून धमक्या आणि तोडफोडीची भाषा करणाऱ्यांनी लोकशाहीची भाषा शिकावी. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा पक्ष बंद करणे पसंत करेन असे स्पष्ट सांगितले होते. मात्र आज त्यांच्याच नावाचा वापर करणारे नेते काँग्रेससोबत सत्तेचा उपभोग घेत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार सोयीप्रमाणे वापरणे थांबवावे आणि त्यांचे हिंदुत्व स्वीकारावे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर