ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बांगलादेशी तरुणीने प्रेमासाठी ओलांडली सीमा:जळगावात दुसरी ‘सीमा हैदर’; तरुणीला अटक अन् तिला आश्रय देणाऱ्या प्रियकरावरही गुन्हा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रेमाला सीमा नसते, असे म्हटले जाते. पण कधी कधी हेच प्रेम देशांच्याही सीमा ओलांडते. सोशल मीडियातून जुळलेल्या प्रेसंबंधांमुळे सीमा ओलांडून भारतात येण्याच्या घटनांत सातत्याने समोर येत असतात. यासंबंधीचे पाकिस्तानी सीमा हैदरचे प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर आता जळगावातही असाच एक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात एक 20 वर्षीय तरुणी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका प्रियकराला भेटण्यासाठी बांगलादेशातून थेट जळगावात आली. आता वैध पासपोर्ट व व्हिसा नसल्यामुळे ती पोलिस चौकशीच्या फेरीत अडकली आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून, तिच्या प्रियकरावरही गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जोशी पेठ, भोई गल्ली परिसरात एक परदेशी महिला अवैधपणे वास्तव्यास असल्याची गुप्त वार्ता शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यात कोणीका राणी श्यामचंद्र राय नामक बांगलादेशी तरुणी त्यांच्या हाती लागली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही वैध दस्तऐवज आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तिला ताब्यात घेतले व पुढील तपास सुरू केला. वैध दस्तऐवजांशिवाय जळगावात पोलिसांच्या माहितीनुसार, कोणीका राणी ही मूळची बांगलादेशाची रहिवासी आहे. तिची इन्स्टाग्रामवर जळगाव शहरातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते आपल्या प्रेमाखातर कोणीका हिने बांगलादेशाची सीमा ओलांडून जळगाव गाठले. त्यानंतर चिन्मय वाला याचा पत्ता शोधून काढत ती त्याच्या घरी पोहोचली. आता हे दोघेही आपले लग्न झाले असल्याचा दावा करत आहेत. पण त्यासंबंधीचा कोणताही वैध पुरावा त्यांच्याकडे आढळला नाही. त्यामुळे पोलिसांनी भारतात अवैध घुसखोरी केल्याप्रकरणी कोणीका राणी हिच्यासह तिला आश्रय देणाऱ्या चिन्मय वाला याच्यावर इमिग्रेशन व परदेशी नागरीक कायदा 2025 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक साजिद मन्सूरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ माजली आहे. आत्ता पाहू काय आहे सीमा हैदर प्रकरण? सीमा हैदर प्रकरण 2023 मध्ये देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणारी सीमा हैदर ही ऑनलाईन गेम ‘PUBG’ च्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील सचिन मीना यांच्या संपर्कात आली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर सीमाने नेपाळमार्गे आपल्या 4 मुलांसह बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. त्यानंतर ती ग्रेटर नोएडा येथे सचिनसोबत राहू लागली. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा रंगली होती. सीमाकडे वैध व्हिसा किंवा प्रवासी कागदपत्रे नसल्याने तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणांनीही या प्रकरणाची चौकशी केली होती. प्रेमासाठी सीमा ओलांडल्याचा दावा करणाऱ्या या घटनेचे सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत मोठे पडसाद उमटले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर