ब्रेकिंग न्यूज
⚡ 3 नव्हे चौघे करणार होते टायगर श्रॉफवर हल्ला, आदल्या दिवशी झाला मोठा कांड, चौथा हल्लेखोर कुठे गायब? ✦ ⚡ पत्रकार भैय्याजी कनाके यांना मातृशोक; प्रभाताई कनाके यांचे निधन ✦ ⚡ दसरा व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च! ✦ ⚡ Badlapur News: बदलापूर हादरलं! शिवसेना संपर्क कार्यालयाबाहेर तरुणावर सपासप वार, मध्यरात्री नेमकं काय घडलं?… ✦ ⚡ किती सोसायचं? ‘तो’ रोज दारू पिऊन यायचा अन्…, 30 वर्षांच्या शीतलचं टोकाचं पाऊल, बीडमध्ये खळबळ ✦ ⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी ✦ ⚡ रब्बी हंगामासाठी पाणी हवेय? शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक, अन्यथा पिकांना बसू शकतो फटका ✦ ⚡ Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म… ✦ ⚡ डेटिंग ॲपवर ओळख, आधी संबंध ठेवले, मग महिलेनं केलं भयंकर कांड , छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना ✦ ⚡ IND vs ZIM : 54 बॉलमध्ये नुसती मॅच जिंकली नाही तर केला रेकॉर्ड, स्मृतीच्या कॅप्टन्सीत पहिलाच मालिका विजय
SP News Maregaon

3 नव्हे चौघे करणार होते टायगर श्रॉफवर हल्ला, आदल्या दिवशी झाला मोठा कांड, चौथा हल्लेखोर कुठे गायब?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Attack on Tiger Shroff: रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तीन जणांनी टायगरच्या बीएमडब्ल्यू कारवर समोरून गोळीबार केला. या हल्ल्यात टायगर श्रॉफच्या चालकासह अन्य एकजण गंभीर जखमी झाला. हल्ल्याची ही घटना उघडकीस येताच सिनेसृष्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आता तीन मुख्य हल्लेखोर आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या इतर चार जणांनाही बेड्या ठोकल्या आहेत. यात दोन तरुणींचा समावेश आहे.

आता या प्रकरणाचा तपास जसाजसा पुढे जात आहे, तसंतसं या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. टायगर श्रॉफवर तीन जणांनी हल्ला केल्याचं व्हिडीओत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असलं तरी हा हल्ला करण्याचा मूळ प्लॅन चार जणांचा होता. संबंधित चौथा आरोपी सेलिब्रीटीची रेकी करताना आरोपींसोबत होता. मात्र हल्ल्याच्या एक दिवस आधी मोठा कांड झाला. चौथा आरोपी पळून गेल्याची माहिती आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला टायगर श्रॉफ हा हल्लेखोरांचा मूळ टार्गेट नव्हता. तर बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान असे टॉपचे अभिनेते हल्लेखोरांच्या टार्गेटवर होते. आरोपींनी त्यांच्या घराची रेकीही केली होती. मात्र चारही अभिनेत्यांना जास्त सिक्युरिटी होती, शिवाय हल्ला करणं अवघड होतं.

त्यामुळे हल्लेखोरांनी आपला मूळ प्लॅन बदलला. त्यांनी अशा अभिनेत्याला शोधलं, जो प्रसिद्धही असेल आणि त्याच्याभोवती सिक्युरिटीचा गराडा नसेल, हल्ला करायला सोपं असेल. यानंतर त्यांनी टायगर श्रॉफवर हल्ला करण्याचं नियोजन केलं. यासाठी त्यांनी गूगलवरून माहितीही काढली. सात दिवस टायगरची रेकी केली.

दरम्यान, दर रविवारी टायगर श्रॉफ जुहू येथील ग्राऊंडवर फुटबॉल खेळायला जातो, त्याच्यासोबत सिक्युरिटी नसते. केवळ चालक असतो, अशी माहिती हल्लेखोरांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी सेल्फी काढण्याचा बहाणा करत टायगर श्रॉफवर गोळीबार करण्याचा प्लॅन केला. हा मूळ प्लॅन चार आरोपींनी मिळून तयार केला होता. मात्र हल्ला करण्याच्या आदल्या रात्री एक आरोपी पळून गेल्याची माहिती आहे. संबंधित आरोपीनं सिगरेट ओढण्याचा बहाणा केला आणि या तीन हल्लोखोरांपासून स्वत:ला वेगळं केलं.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर