सातारा जिल्ह्यात सावरी गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळ असलेल्या एका शेडमधून मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईतून जवळपास 45 किलो ड्रग्स जप्त केले असून याची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी इतकी आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील निशाणा साधला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई येथील टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, सावरी गावात एवढा मोठा ड्रग्सचा कारखाना सुरू होता याची कल्पना सातारा पोलिसांना होती पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलिस अधीक्षक आहेत ज्यांनी आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठी हल्ला केला होता. साताऱ्यातील ड्रग्स प्रकरणी शिंदे व फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस आणि शिंदे यांनी दिले पाहिजे. एवढा मोठा ड्रग्सचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सूत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावरी गावाजवळच एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा हा काळा धंदा सुरू होता. सावरी गावातील ड्रग्सचा कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लागेबांधे असल्यानेच सरकार ठोस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सातारा ड्रग्स प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी निवडणुक आयोगाची मदत घेण्यात आली व महानगरपालिका निवडणुकांची घाईघाईने घोषणा करण्यात आली. मतदार याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. 15 तारखेला मतदार याद्या जाहीर करणार होते पण आता बुथनिहाय 27 तारखेला या मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास 23 तारखेपासून सुरुवात होत आहे आणि उमेदवारी अर्जावर उमेदवाराला तसेच सुचक, व अनुमोदक यांना त्यांचे मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक लिहावा लागतो पण मतदार याद्याच नाहीत तर अर्ज कसे भरणार? असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला. राज्यातील पाब्लो शिंदेला अटक का नाही? महाराष्ट्रातील विशेषतः सातारा जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरणी महाराष्ट्र कॉंग्रेसने ट्विट करत राज्यातील पाब्लो शिंदेला अटक का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच गृहमंत्र्यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र कॉंग्रेसने उपस्थित केले प्रश्न खालीलप्रमाणे आहेत: 1. विशाल मोरे आणि त्याचे तीन सहकारी सावरी गावात ड्रग्स बनवतात असे पोलिसांना सांगितल्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे. परंतु विशाल मोरे हा पुण्यातील अजित दादा गटाचा विद्यार्थी अध्यक्ष आहे, मग त्याला सातारा जिल्ह्यातील सावरी या दुर्गम भागातील शेड ड्रग्स बनवण्याकरिता कशी उपलब्ध झाली? तो जळका वाडा विशाल मोरे ने ड्रग्स बनवण्यासाठी का निवडला? त्या ठिकाणी साहित्य त्याने कोणाच्या मदतीने नेले? पश्चिम बंगालमधील कामगार त्याने इतक्या दुर्गम स्थळी नेऊन ठेवले या सर्वांना कोणाचे अभय होते? 2. ओंकार दिघे हा व्यक्ती सुद्धा पोलिसांना सदर ठिकाणी आढळून आला, तसेच घटनास्थळावर केलेल्या तपासातून या सर्व ड्रग्स फॅक्टरी ची सूत्रे प्रकाश शिंदे त्याच्या तेजस हॉटेलमधून चालवत असल्याचे पोलिसांना त्याच क्षणी तपासात निष्पन्न झाले. परंतु उपमुख्यमंत्री यांचा एक सचिव व श्रीकांत शिंदे यांचा पीए यांनी कारवाई करता गेलेले सीनियर पी आय आत्माजी सावंत यांच्यावर प्रचंड दबाव आणला. उपमुख्यमंत्री यांनी आयुक्त क्राईम ब्रांच यांच्यावर दबाव आणत सिनियर पीआय यांनी वरिष्ठांचा आदेश मानत ओंकार दिघे याला ताब्यात घेतलेले असताना परत स्थानिक नेत्यांकडे पाठविले. 3. सदर ड्रग्स ची Quantity पाहता हे फक्त तीन माणसांनी तयार केलेले नाही. त्यासाठी खूप मोठी यंत्रणा राबली आहे. या सर्व रॅकेटचा सूत्रधार प्रकाश शिंदे आहे. या प्रकाश शिंदे हा एकनाथ शिंदे यांचा भाऊ असून त्यांना एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांचे पाठबळ आहे. प्रकाश शिंदे यांच्या वतीने ओंकार दिघे याने तेजस हॉटेल येथे परप्रांतीय कामगारांची व्यवस्था लावली व तेथे प्रकाश शिंदे हाच ड्रग निर्मिती करून घेत होता. ज्या दिवशी विशाल मोरे वर कारवाई झाली त्या क्षणी प्रकाश शिंदे तेजस हॉटेल वरून निघून गेला. परंतु ओंकार दिघे हा पोलिसांना सापडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते चौकशी चालू होती त्यावेळी उपमुख्यमंत्री यांचे एक सचिव यांनी आयुक्त यांना फोन करून दबाव टाकला व श्रीकांत शिंदे यांचे खाजगी सचिव यांनी फोनवरून कारवाई करता गेलेल्या सीनियर पी आय ला स्वतः श्रीकांत शिंदे यांनी कारवाई करू नका यासाठी दबाव टाकला. 4. पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती ही खोटी व दबावापोटी दिलेली आहे. एकटा विशाल मोरे इतक्या दुर्गम ठिकाणी ड्रग्स रॅकेट चालवू शकत नाही. तर ड्रग्स निर्माता हा स्वतः प्रकाश शिंदे आहे जो हॉटेलवरून अगोदरच निघून गेला. 5. ज्या ओंकार दिघे याला पोलिसांनी घटनास्थळावर ताब्यात घेतले होते त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री व श्रीकांत शिंदे यांच्या दबावामुळे सोडण्यात आले. त्याच्यावर यापूर्वीही बलात्कारासारख्या गंभीर तक्रारी झाल्या होत्या त्यावेळी देखील प्रकाश शिंदे यांनी मध्यस्थी करून ओंकार दिघेला अभय दिले आहे. 6. प्रकाश शिंदे, विशाल मोरे, ओंकार दिघे, सदर कारवाईसाठी हजर असलेले सिनियर पीआय यांचे सीडीआर पोलिसांनी उघड करावेत. त्यातून लगेचच सर्वांचे संबंध निष्पन्न होईल. तसेच सीनियर पीआय वर कोणी दबाव आणला हे ही स्पष्ट होईल. 7. विशाल मोरे ला ताब्यात घेतले तेव्हा त्याने वापरलेली उबेर रिक्षाच्या ड्रायव्हरचे स्टेटमेंट सुद्धा पोलिसांनी घेतले आहे. परंतु ड्रग्स बनवणाऱ्या कामगारांचे नियोजन बघणारा ओंकार दिघे याला कारवाई दिवशी ११ वाजता गावच्या सरपंचाच्या ताब्यात दिले व त्यांचा कोणताही संबंध पोलिसांनी दाखवला नाही. 8. मुंबई पोलीस प्रामाणिकपणे काम करत होते, ते दबावाला बळी पडत नव्हते त्यावेळी जाणून बुजून सातारा एस पी यांना सदर ठिकाणी पाठविण्यात आले व तपासात ढवळाढवळ करण्यात आली. 9. याप्रकरणी सातारा एसपींची बदली झाली पाहिजे. या तुषार दोषी यांनी जालना एसपी असताना अंतरवली येथे सामान्य मराठा आंदोलकांवर लाठी चार्ज केला होता, याचे बक्षीस म्हणून सातारा जिल्ह्याचा पदभार त्यांना देण्यात आला. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा एसपींनी सरकारच्या बाजूने भूमिका घेतली. यावेळी देखील ते सरकार मधील बगलबच्च्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण असो, ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या गावात शेकडो वेळा सातारा पोलिसांचा ताफा गेला आहे तिथे ड्रगचे मोठे घबाड सापडणे इतक्या गंभीर घटना असूनही केवळ एस पी हे गृहमंत्र्यांचे लाडके असल्यामुळेच त्यांची बदली होत नाही.
राज्यातील पाब्लो शिंदेला अटक का नाही?:साताऱ्यातील ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंचे लागेबांधे, महाराष्ट्र कॉंग्रेसचा गंभीर आरोप
-
By सुरेश पाचभाई
- December 17, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
विमान दुर्घटनेला शरद पवारांनी अपघात का म्हटले?:भास्कर...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री:देवेंद्र...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य:ब्लॅक बॉक्स जळाला म्हटल्यावर...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
अर्थसंकल्पीय अधिवेशन:विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत दिवंगत अजित पवारांचा...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
