ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मालेगाव 2006 स्फोटातील चौघे निर्दोष:4 स्फोट, 31 बळी… पुरावेदेण्यात एनआयएला अपयश

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणातील चारही आरोपींना दहशतवादासह (यूएपीए) सर्व आरोपांतून दोषमुक्त केले आहे. तब्बल 19 वर्षांनंतर आलेल्या या निकालामुळे 31 निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या या साखळी स्फोटांसाठी नेमके जबाबदार कोण? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राजेंद्र चौधरी, धान सिंह, मनोहर नरवरिया आणि लोकेश शर्मा या आरोपींवर खून, गुन्हेगारी कट रचणे आणि ‘यूएपीए’ या कठोर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. त्याला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीदरम्यान अपुरे पुरावे सादर केले गेले तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सुनावणीदरम्यान एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करता आला नाही. या आधारावर खंडपीठाने चौघांना आरोपांतून मुक्त केले. बडा कब्रस्तान, मशिदीजवळ झाले होते स्फोट मालेगाव शहरात शब – ए – बारातच्या दिवशी 8 सप्टेंबर 2006 रोजी दुपारी 1.45 वाजेदरम्यान बडा कब्रस्तान व हमीदिया मशिदीजवळ नमाज संपत असताना सलग चार स्फोट झाले होते. हल्लेखोरांनी सायकलींवर बॉम्ब ठेवले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर 312 जण गंभीर जखमी झाले होते. निकालास सुप्रीम कोर्टात आव्हान देणार 2008 बॉम्बस्फोटाच्या निकालास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जमियतच्या वरिष्ठ वकिलांच्या समितीशी चर्चा करुन 2006 च्या स्फोटांबाबतच्या या निकालाविरोधातही सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. – ॲड. शाहिद नदीम, जमियतचे वकील. पुराव्यांच्या अभावामुळे आरोप निश्चितीवर प्रश्न पुराव्यांचा अभाव : ‘एनआयए’ ठोस पुरावा किंवा साक्षीदारही सादर करू शकली नाही यांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.
दीर्घ कारावास : या चौघांना 2019 मध्येच जामीन मिळाला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, कोणताही खटला न चालता हे आरोपी 6 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत.
आरोपनिश्चितीवर सवाल: पुरावे, साक्षीदार नसल्यामुळे आरोपांची पायाभूत रचना कमकुवत ठरल्याचा मुद्दा आरोपींच्या वकिलांनी मांडला होता. यापूर्वीच इतर आरोपींची सुटका झाल्याचा संदर्भ देत हा खटला टिकू शकत नाही, असा युक्तिवाद केला. … मग बॉम्बस्फोट घडवले कुणी?- जमियत सर्वच निर्दाेष आहेत तर मालेगावात बॉम्बस्फोट कुणी घडवले असा सवाल जमियत उलमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मौलाना अब्दुल कय्युम कासमी व सचिव डॉ. अखलाख अन्सारी यांनी केला. अन्सारी म्हणाले, 2008 च्या प्रकरणासारखेच याही आरोपींची मुक्तता झाली. स्फोट घडले, निष्पाप बळी गेले. तरीही स्फोट घडवणारे निष्पन्न होत नाही हे तपास यंत्रणेचे अपयश आहे. 2008 प्रकरणात सरकारने अपील दाखल केले नाही. या खटल्यातही सरकार अपील दाखल करणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर