ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

कुसुंबी गटात मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंलना धक्का:जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नीचा पराभव; शिवसेनेच्या कविता ओंबळे विजयी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे. या जिल्हा परिषद गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दबदबा पाहायला मिळाला. कुसुंबी जिल्हा परिषद गटातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. सातारा जावळीचे आमदार मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे निकटवर्तीय अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला असून, या गटात शिवसेनेच्या कविता ओंबळे या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि शशिकांत शिंदे यांनी एकत्र येत कविता ओंबळे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत कुसुंबी गटात भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. दरम्यान, मंत्री जायकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झाला आहे. या गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. औंध गटात सुद्धा जयकुमार गोरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. औंध गटात त्यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झाला आहे. तर औंध गटात मनिषा फडतरे या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विजयी झाल्या आहेत. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे आंधळी गटातून भाजपकडून विजयी झाल्या आहेत. तब्बल 18 हजार मताधिक्याने त्यांनी हा विजय मिळवला आहे. सोनल गोरे यांच्या उमेदवारीला जयकुमार गोरे यांनी तीव्र विरोध केला होता. तर तिकडे शंभुराज देसाई यांनी पाटण पंचायत समितीत सत्तांतर घडवून आणले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर